
तिखी (ता. कर्जत) येथील विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे साहेब यांचे विश्वासू युवा, कार्यक्षम आणि निष्ठावान कार्यकर्ते अजय दळवी यांची भारतीय जनता पक्षाच्या कर्जत तालुका सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. पक्षातील दीर्घकाळापासून सक्रिय असलेले अजय दळवी यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक कामातून आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या निवडीचे कर्जत तालुक्यात सर्वत्र स्वागत होत असून, पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निवडीबद्दल विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे साहेब आणि तालुकाध्यक्ष अनिल गदादे यांनी अजय दळवी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील संघटन अधिक मजबूत होईल, कार्यकर्त्यांना नवे बळ मिळेल आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपला निश्चितच याचा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला.
अजय दळवी यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले की, “पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासास मी पूर्णपणे न्याय देईन. कर्जत तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचविण्यासाठी आणि संघटन विस्तारासाठी मी प्रामाणिकपणे कार्य करणार आहे.”
गेल्या अनेक वर्षांपासून संघटनाशी एकनिष्ठ राहून त्यांनी पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या मेहनती, लोकसंपर्क आणि संघटन कौशल्यामुळे ही निवड झाल्याचे मानले जात आहे.
अजय दळवी यांच्या या निवडीमुळे कर्जत तालुक्यात भाजप संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.






