
” कायद्याचे ज्ञान व स्वयंशिस्त यशाचा मार्ग सुकर करतात. विद्यार्थ्यानी कठोर मेहनत, एकाग्र होऊन अभ्यास व नियमित सराव केल्यास यश निश्चित मिळते. पालकांनी देखील आपला पाल्य नेमके काय करतो? कुणाच्या संगतीत राहतो? यावर लक्ष ठेवले पाहिजे” असे प्रतिपादन विभागीय पोलीस अधिकारी मा. विवेकानंद वाखारे यांनी केले. दादा पाटील महाविद्यालयात बारावीमध्ये शिकलेल्या व सीईटी परीक्षेत ९० पर्सेंटाईलपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या २० विद्यार्थ्याच्या व केंद्रीय नीट परीक्षेत ४५० हून अधिक गुण मिळविणाऱ्या ०५ विद्यार्थ्यांच्या सन्मान समारंभप्रसंगी त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय नगरकर होते.
सी.ई.टी.परीक्षेत प्रशांत राजेश सुथार या विद्यार्थ्याने ९९.९१ पर्सेंटाईल गुण मिळवून तालुक्यात सर्वोच्च स्थान प्राप्त केले. यशिवाय बारावी सीईटी परीक्षेत महाविद्यालयातील एकूण वीस विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त पर्सेंटाईल मिळालेल्या दीप निलेश मोरे (९९.१३), सपना राजेंद्र धुमाळ(९८.४०), विद्या भागवत गुंजाळ (९७.९४), स्वप्निल हरिश्चंद्र तांबे (९७.९१), रुद्रा दिनेश गाडे (९६.४६), वाडेकर निशा शरद (९६.०४), निखिल देविदास फरताडे (९५.३८), पूजा गणेश बरबडे (९५.१६), शिवाणी हनुमंत गव्हाणे (९३.७२), प्रचिती वाल्मीक भवर (९२.५८), भूमिका अजय देवकुळे (९२.२६), आदित्य ज्ञानेश्वर महाराज (९१.७८), औटे वैष्णवी (९१.३२), विराज कैलास मुरकुटे (९०.८९), समृद्धी विक्रम कांबळे (९०.७६), संस्कृती वैजिनाथ काळे (९०.५२), गणेश दादा अनारसे (९०.५१), नारायण बलभीम दंडे (९०.२७), उत्कर्षा संतोष लबडे (९०.१३) असे पर्सेंटाईल मिळविलेल्या व केंद्रीय नीट परीक्षेत संकेत भरत सस्ते या विद्यार्थ्याने ६५० मार्क मिळवून एमबीबीएसला आपला प्रवेश निश्चित केल्याबद्दल तसेच शंतनू उद्धव मुरकुटे (५७२), रोहित दत्तात्रय गायकवाड (५५६), श्रावणी संजय माऊलकर (५४४), तनुजा भरत मेढे (४१५), प्रशांत राजेश सुधार (४४१) या नीट परीक्षेत गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानानंतर विवेकानंद वाखारे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, गुणवंतांचा बाप होणे हे भाग्य असते. साडेतीनशे वर्षांपूर्वी किल्ल्यांना, शंभर वर्षांपूर्वी लढाईला, पन्नास वर्षांपूर्वी शरीर बळकट करण्याला जे महत्व दिले गेले तसे आज गुणवत्तेला महत्त्व आलेले असल्याचे सांगितले.
दादा पाटील महाविद्यालय हे एक संस्कार केंद्र आहे. स्वतःवर विश्वास असणारा व परिस्थितीचा फायदा घेणारा विद्यार्थी आज यशस्वी होत आहे. परीक्षार्थी म्हणून नाही तर सर्वांगीण होऊन यशस्वी होण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी विद्यार्थ्यांना केले.
याप्रसंगी प्रशांत सुथार, संकेत सस्ते, आदित्य महाराज, संस्कृती काळे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना कोणताही खासगी क्लास न लावता शिक्षकांनी नियमित केलेले मार्गदर्शन, आई – वडिलांचे स्वप्न व नियमित अभ्यास केल्यामुळे आम्ही यश मिळवू शकलो अशा भावना व्यक्त केल्या. तसेच पालकांच्या वतीने प्रा. विक्रम कांबळे, श्री वैजनाथ काळे, बलभीम गायकवाड यांनीही मनोगते व्यक्त करताना महाविद्यालयातील गुणात्मक वातावरण व नियमित सराव घेतल्यामुळे आमच्या मुलांना उत्तम गुण मिळाल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रवीण घालमे, आभार प्रा. जयदीप खेतमाळीस तर सूत्रसंचालन प्रा. मीना खेतमाळीस व प्रा. एस. एस. भोसले यांनी केले.






