
विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे साहेब यांच्या वतीने कर्जत तालुक्यातील विविध गणेश मंडळांना तिरुपती बालाजीच्या पवित्र लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले. गणेश भाविकांना हा प्रसाद देण्यात आला. हा प्रसाद विशेष प्रयत्न करून तिरुपती येथून प्रा.राम शिंदे साहेब यांनी उपलब्ध करून दिला होता.
प्रा.राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली समाजहिताचे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. गणेश भाविकांना तिरुपती बालाजी प्रसादाचा लाभ मिळावा ही त्यांची भावना होती आणि ती आज प्रत्यक्षात साकार झाली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अशा धार्मिक व सामाजिक उपक्रमांमुळे भाविकांना आध्यात्मिक समाधान लाभते.
प्रा.राम शिंदे यांचे कार्य हे सदैव लोकाभिमुख राहिले आहे आणि त्यातून समाजात श्रद्धा, विश्वास आणि एकोपा वाढीस लागतो.
प्रा.राम शिंदे साहेब हे दरवर्षी अनेक गणेश मंडळांना भेट देत असतात यावरून प्रा.राम शिंदे साहेब यांची गणेशावर असणारी श्रद्धा दिसून येते.
तिरुपती बालाजीचा प्रसाद तालुक्यात वाटण्याचे नियोजन भा.ज.पा. तालुकाध्यक्ष अनिल गदादे, तसेच राम शिंदे साहेब यांचे कार्यालय प्रमुख श्री.शेखर नवले व प्रसाद भोसले यांनी केले .







