मराठा समाजास तात्काळ आरक्षण द्या  आरक्षण न दिल्यास येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जागा दाखवणार

Google search engine

 

 

कर्जत तालुक्यातून पक्षाने कुठेही मराठा आरक्षण पाठिंबा दिला नाही याची खंत तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना आहे पण मराठा आरक्षण या विषयावर बोलायला कुणीही तयार नाही .

मराठा आरक्षण मागणीसाठी पुढाकार दत्तात्रय ढोबे पाटील यांनी घेतला आहे.

येणाऱ्या स्वराज्य संस्थेत निवडणुकीत काँग्रेस व इतर पक्षास मराठा समाज यांना जागा दाखवून देईल अशी प्रतिक्रिया सचिन फरताडे टाकळी खं.विद्यमान उपसरपंच पती , आबासाहेब फरताडे यांनी व्यक्त केली.

यावेळी मराठा समाजातील नेत्यांनी पुढाकार घेऊन आरक्षण मागणीसाठी धाडसाने समोर येण्याचे आवाहन करण्यात आले. या विषयात उपसरपंच आबासाहेब फरताडे यांनी पुढाकार घेऊन समाजाच्या ज्वलंत विषय मराठा आरक्षण प्रश्नी आग्रही मागणी करून आरक्षण न दिल्यास येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागा दाखवून देऊ असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

यावेळी बोलताना दत्तात्रय ढोबे म्हणाले , मराठा समाजास तात्काळ आरक्षण द्या , आरक्षण न दिल्यास येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मोठी किंमत मोजावी लागेल व याची सुरुवात टाकळी खंडेश्वरी येथूनच होईल अशी प्रतिक्रिया दत्तात्रय ढोबे यांनी दिली.