
कुळधरण गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आमदार रोहित दादांचे कट्टर कार्यकर्ते तथा कोपर्डीचे विद्यमान सरपंच शांतीलाल सुद्रिक हे इच्छुक असून आमदार रोहित दादा पवार यांनी संधी दिल्यास ते जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार आहेत.
सरपंच शांतीलाल सुद्रिक हे नवखे व होतकरू असे सरपंच आहेत. ते कोपर्डी ग्रामपंचायत मध्ये जनतेतून निवडून आलेले असून त्यांचा या गटातील सर्वच गावांत मोठा जनसंपर्क आहे. त्यांनी ग्रामपंचायत लढवल्या नंतर कोपर्डी ग्रामपंचायत तालुक्यांमध्ये एक वेगळी चर्चा निर्माण झाली. या गटातील सर्वच गावांत त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. युवक कार्यकर्त्यांची त्यांच्या पाठीमागे मोठी फौज असून आ.रोहित दादा पवार यांच्याकडे या गटासाठी शांतीलाल सुद्रीक यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे.त्यांनी कोपर्डी ग्रामपंचायतच्या माध्यमातून मोठी विकासकामे त्यांनी मार्गी लावले आहे.
कोपर्डी गावात त्यांनी सरकार दरबारी मोठा पाठपुरावा करून दीडशे घरकुल मार्गे लावली .आमदार रोहित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून बारामती ते नगर हा रस्ता राज्य महामार्ग दर्जामध्ये बसवला तसेच बिटकेवाडी ते कोपर्डी या रस्त्याचे काम मंजूर असून लवकरच ते पूर्णतः जाणार आहे गावामध्ये शाळा मंदिर , सामाजिक सभागृह , वृक्षारोपण तसेच डोळ्याचे शिबिर आरोग्याची शिबिर रक्तदान यासारखे सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले आहेत.
तसेच गावामध्ये नवीनच जिल्हा परिषद शाळेची इमारत बांधकाम लोकसहभाग व शासन दरबार पाठपुरावा करून आठ खोल्यांचे बांधकाम सुरुवात करणार आहेत.
आमदार रोहित दादा पवार यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यास संधी दिल्यास सर्व ताकदीनिशी जिल्हा परिषद निवडणूक लढविली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.






