
नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच महात्मा फुले नूतन महाविद्यालय मिरजगाव या विद्यालयातील प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, मुख्य लिपिक यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा शनिवार दिनांक २८ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे अध्यक्ष कर्मयोगी डॉ. ए.बी चेडे साहेब होते. या कार्यक्रमासाठी रुरल एज्युकेशन सोसायटीचे, उपाध्यक्ष डॉ. महेंद्र चेडे, संस्था सदस्य निशाताई जाधव, संस्थेच्या सहसचिव अंजली चेडे, शालेय समिती सदस्य सर्जेराव बावडकर, कर्जत तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण साहेब,व मान्यवर उपस्थित होते.
या सेवापूर्ती सोहळ्यामध्ये नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य. श्री.दत्तात्रय श्रीमंदिलकर, उपप्राचार्य जयंत चेडे, आदर्श क्रीडा शिक्षक श्री. शांताराम बावडकर, सहशिक्षक श्री.सुदाम माळी, श्री तात्याराम झगडे, ज्येष्ठ लिपिक महादेव भुजबळ, तसेच महात्मा फुले नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक व महाविद्यालयाचे जेष्ठ लिपिक विठ्ठलराव वीर पाटील या सर्व कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सेवानिवृत्त सर्व शिक्षकांबद्दल मुख्याध्यापक सूर्यवंशी अशोक, प्राध्यापक नन्नवरे बापू, प्रभारी प्राचार्य तानाजी जाधव, चाकणे संजय आदींनी सेवानिवृत्त शिक्षकांच्या कार्याबद्दल आपली मनोगत व्यक्त केली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
सेवानिवृत्त शिक्षकांनी आपली मनोगत व्यक्त करताना शाळेबद्दल आदर, स्नेह व्यक्त केला. या कार्यक्रम प्रसंगी रुरल एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांचे कर्मचारी उपस्थित होते. त्याचबरोबर सेवानिवृत्त शिक्षकांचे आप्तेष्ट, नातेवाईक,सखे,सोयरे तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सर्वांच्याच उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष बोराटे यांनी केले तर स्वरचित स्वागत गीत संगीत अलंकार संजय तुपे सर, हार्मोनियम वादक संतोष नलगे सर व त्याला साथ संगत दिली ती शालेय विद्यार्थी यांनी. या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय निंबाळकर यांनी केले. शेवटी कार्यक्रम सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांसाठी, सर्व शाखातील शिक्षकांसाठी स्वादिष्ट भोजनाचे नियोजन केले होते.






