साईकृपा कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांचे १००% देदीप्यमान यश!

Google search engine

 

साईकृपा कृषी महाविद्यालय, घारगाव येथील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या सातव्या व आठव्या सत्राच्या परीक्षेत १००% निकाल मिळवून देदीप्यमान यश संपादन केले आहे. महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या या परीक्षेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश अत्यंत कौतुकास्पद आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर निंबाळकर आणि परीक्षा विभाग प्रमुख के. के. पाठक यांनी ही माहिती दिली.

या यशात कुमार ओंकार थोरात याने ८.८ सीजीपीए मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर कुमार तुषार रोमन आणि कु. अमृता कुर्हे यांनी प्रत्येकी ८.७ सीजीपीए मिळवून संयुक्तपणे द्वितीय स्थान प्राप्त केले. कु. वैष्णवी पठारे हिने ८.६ सीजीपीए मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री दत्तकृपा शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष माननीय श्री. दत्तात्रय पानसरे साहेब, सचिव सौ. आर्चनाताई पानसरे मॅडम, संस्थेचे रजिस्टर श्री. कल्याण शिंदे सर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर निंबाळकर सर आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. तसेच, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस आणि उज्ज्वल भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल महाविद्यालयात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.