
येथील संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरु कृषी महाविद्यालय मध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 198 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
महात्मा फुले यांच्या जयंती प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शंकरराव नेवसे सर, संस्थेच्या अध्यक्षा सौ .कल्याणीताई नेवसे मॅडम, संस्थेचे सचिव राजेंद्रजी गोरे सर, प्रशासकीय अधिकारी सखाराम राजळे सर उपस्थित होते. त्याचबरोबर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे सर, महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित प्राध्यापक माने सर, प्राध्यापिका इनामके मॅडम, शिंदे मॅडम यांनी आपले मनोगत मांडले.
संस्थेचे संस्थापक डॉ. शंकरराव नेवसे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महात्मा फुले यांनी खूप कठीण परिस्थितीमध्ये शिक्षण आणि समाजसेवेचा जो वारसा आपल्याला दिला तो अहोरात्र चालू ठेवण्यासाठी आपल्या प्रत्येकाने कष्ट घेतले पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ मोहिनी शिंदे मॅडम यांनी मानले.







