भारतीय नरहरी सेना प्रणित सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुखपदी अतुल चंद्रकांत पंडित यांची निवड

Google search engine

 

 

भारतीय नरहरी सेना प्रणित सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुखपदी अतुल चंद्रकांत पंडित यांची निवड करण्यात आली. प्रदेश अध्यक्ष श्री.उमेशशेठ सुरेशराव बुऱ्हाडे यांच्या स्वाक्षरीने त्यांना हे निवडपत्र प्रदान करण्यात आले.

मिरजगाव येथील नामांकित सराफ व्यावसायिक अतुल चंद्रकांत पंडित यांची सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुखपदी नुकतीच निवड करण्यात आली . ही निवड भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बुऱ्हाडे यांच्या ‘सराफ सुवर्णकार यांच्या न्याय व हक्काचे संरक्षण करणे’ हा संकल्प करून दिलेल्या आदेशानुसार सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष उमेशशेठ सुरेशराव बुहऱ्हाडे, सचिव गणेशशेठ दुर्गादास बनछोड, भारतीय नरहरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांना या नियुक्तीचे पत्र सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष उमेशशेठ बुऱ्हाडे यांच्या हस्ते देण्यात आले.

या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा .काकासाहेब बुऱ्हाडे यांच्या

सराफ सुवर्णकार व संलग्न व्यावसायिक यांच्या न्याय व हक्कांच्या संरक्षण करण्यासाठी करावे असे दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

यावेळी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. अतुल पंडित यांची सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुखपदी निवड झाल्याने उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गणेश टाके, महिला अध्यक्षा अर्चनाताई दिंडोरे, राज्य कार्याध्यक्ष विशाल वेदपाठक, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष ओंकार गटगिळे तसेच राज्य कार्यकारिणी व जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांसह मिरजगाव येथील सुवर्णकार , सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.