आई जगदंबेच्या पावनभूमीत राशीन येथील ३५ वर्षांपासूनचा रखडलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी सद्गुरू गोदड महाराजांचा सेवक म्हणून कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विकासकामे करण्याची संधी मिळाली याचा सार्थ अभिमान वाटतो :- उपसभापती अभय उर्फ आबासाहेब पाटील

Google search engine

 

आई जगदंबेच्या पावनभूमीत गेल्या ३५ वर्षांपासूनचा उपबाजार समिती राशीन येथील विकासाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या माध्यमातून सद्गुरू गोदड महाराजांचा सेवक म्हणून मला उपसभापती पदाच्या रूपाने संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो , असे प्रतिपादन कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान उपसभापती अभय उर्फ आबासाहेब पाटील यांनी केले.

पाडव्याच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच येत्या 30 मार्च रोजी कर्जत-जामखेडचे भाग्यविधाते व महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषद सभापती राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राशीन उपबाजार समितीच्या नवीन व्यापारी संकुलाचा शुभारंभ होणार आहे.

याबद्दल माहिती देताना उपसभापती आबासाहेब पाटील म्हणाले की, कर्जत-जामखेडचे भाग्यविधाते सभापती राम शिंदे साहेबांनी नेहमीच तालुक्यात विकासाची गंगा आणण्याचे काम केले आहे. हाच विकासात्मक दृष्टीकोन समोर ठेऊन बाजार समितीच्या माध्यमातून कायमच शेतकरी, व्यापारी, कामगार, हमाल, मापाडी आणि सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जाताहेत.

त्यातीलच एक महत्वाचे पाऊल म्हणजे राशीन शहराच्या विकासाचा चेहरामोहरा बदलून टाकणारे उपबाजार समितीच्या माध्यमातून उभारण्यात येणारे हे व्यापारी संकुल होय.

खरं तर कर्जत तालुका बाजार समितीची स्थापना खूपच जुनी असून तालुक्याच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे अन आज पुन्हा एकदा राम शिंदे साहेबांच्या सहकार्याने व विकासनशील दृष्टीकोणाने या बाजार समितीच्या माध्यमातून विकासाची गंगा निरंतर चालू ठेवण्यासाठी माझ्यासोबतच सभापती , सर्व संचालक मित्र, व्यापारी, माझे माथाडी कामगार, कर्मचारी कायम प्रयत्नशील असतात अन इथून पुढे देखील असतील ही ग्वाही मी या निमित्ताने सर्वांना देतो.

त्यामुळे येत्या ३० तारखेला पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सर्वांनी मोठ्या संख्येने राशीन येथे उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी उपसभापती अभय उर्फ आबासाहेब पाटील यांनी केले आहे.

कर्जत तालुका बाजार समितीच्या माध्यमातून ना भूतो अश्या सर्वसमावेशक पद्धतीने कामकाज चालू आहे यासाठी सभापती महोदय राम शिंदे साहेब यांचे कायमच मार्गदर्शन असते अन त्यामुळेच सर्वानुमते ३५ वर्षांपासूनच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढून अगदी सहजपणे विकासात्मक भूमिका बजावता आली, याचा अत्यंतीक आनंद आहे. तसेच स्थानिक विषयांवर मार्ग काढत असताने जेष्ठ नेते अंबादास पिसाळ यांची तर दुसऱ्या पक्षात असूनसुद्धा राजेंद्र तात्या फाळके यांची देखील बाजार समितीला मोलाची साथ असते. त्यामुळे मी उपसभापती पदावर लोकाभिमुख काम करत असताने सबका साथ,सबका प्रयास अन सबका विकास …या त्रिसूत्रीवरच काम करण्याचा सभापती शिंदे साहेबांचा मानस असतो म्हणूनच येत्या काळात हाच विचार ध्यानात ठेऊन सर्वपक्षीय सर्वसमावेशक काम करणारी कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील एकमेव बाजार समिती असेल, असे गौरवोद्गार उपसभापती अभय उर्फ आबासाहेब पाटील यांनी काढले.

कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासाचा हा डोंगर म्हणजे सद्गुरू गोदड महाराज आणि आई जगदंबेचा सभापती राम शिंदे साहेब यांच्यावरील असणारा आशीर्वाद होय.