जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला आर्थिक विकास महामंडळ अहिल्यानगर अंतर्गत अहिल्याबाई CMRC , मिरजगाव येथे पुष्कराज मंगल कार्यालयात 1 वार्षिक सर्वसाधारण संपन्न 

Google search engine

 

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला आर्थिक विकास महामंडळ अहिल्यानगर अंतर्गत अहिल्याबाई cmrc मिरजगाव येथे पुष्कराज मंगल कार्यालय मध्ये दिनांक 10 मार्च रोजी 13 वि वार्षिक सर्वसाधारण सभा, महिलांकरता कायदेविषयक जाणीजागृती शिबिर तसेच महिला मेळावा हिमोग्लोबिन चेकअप कॅम्प व महिलांना रोजगार निर्मिती व जेंडर ट्रेंनिग ,या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत माविम बचत गटातील महिलांनी उत्पादित वस्तूचे भव्य प्रदर्शनाचा आज तिसऱ्या दिवशी महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला या मेळाव्याच्या निमित्ताने महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री संजय गर्जे अहिल्यानगर उपस्थित होते तसेच icici बँक चे श्री राजेंद्र खांदे , जिल्हा मिरजगाव विद्यमान सरपंच सौ सुनीता नितीन खेतमाळस उपसरपंच सौ संगीता आबासाहेब वीर ,cmrc अध्यक्ष सौ आशा अनिल घोडके व्यवस्थापक श्रीकांत चव्हाण कोकणगाव ग्रामसेवक सौ पल्लवी जोगदंड , डॉ अमृता भोसले उपस्थित होते या प्रदर्शनामध्ये cmrc च्या वतीने तीस उत्कृष्ट उद्योजक महिला सत्कार करण्यात आला तसेच उत्कृष्ट 30 बचत गटाचा सत्कार करण्यात आला,उत्कृष्ट माता याचा सत्कार करण्यात आला ,icici बँक च्या वतीने कर्जवाटप 4 गटांचे 23 लाख रुपयांचे कर्ज वाटप पूरक पोषक आहार तिरंगा थाळी या मध्ये 3 महिलांचं सत्कार करण्यात आले तसेच जेंडर चॅम्पियन की ज्या महिलांना त्यांच्या गावातील पुरुष महिलांना सक्षमीकरणासाठी मदत करतात अशा जेंडर चॅम्पियनचा यावेळी सत्कार करण्यात आला त्यानंतर महिलांसाठी खेळ पैठणीचा या कार्यक्रम या खेळामध्ये तीन विजेत्या महिलांना महिलांना बक्षीस वितरण करण्यात आले,पिंक रिक्षा डेमो घेण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहिल्याबाई लोकसंचालित साधन केंद्राच्या कार्यकारणी,गाव प्रतिनिधी ,तारांगण fpc च्या कार्यकारणी , व्यवस्थापक ,लेखापाल,उपजिविका सल्लागार व सर्व सहयोगिनी व CRP, कर्मचारी रुंद यांनी अथक परिश्रम घेतले