
लोणी व्यंकनाथ येथे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत प्रतिभाताई पाचपुते होत्या तर मनीषा ताई नाहटा यांच्या अध्यक्षतेखाली आजचा कार्यक्रम पार पडला. सविधान अभियान अंतर्गत लोणी व्यंकनाथ येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला गुलाब पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. संविधानातील उद्देशिका, गुलाब पुष्प आणि फेटे बांधून पाहुण्यांचे स्वागत केले तर आलेल्या सर्वच महिलांना फेटे बांधून सन्मानित करण्यात आले. विविध गटांच्या रस्सी खेच, चेंडू फेक, आणि संगीत खुर्चीच्या स्पर्धा घेण्यात आल्या आणि विजयी गटाला बक्षीस देण्यात आले. ढगे मॅडम यांनी दहा मिनिटे मासिक पाळीवर डेमो घेतला.
प्रतिभाताई पाचपुते बोलताना म्हणाल्या की आदिवासी समाजातील महिला स्वतः शिक्षण घेऊन आज समाजाचे नेतृत्व करते याचा अभिमान वाटतो आणि म्हणून महिलांनी विविध क्षेत्रात स्वतः पुढे आले पाहिजे असे म्हणाले तर छाया भोसले किती झळ सहन करून आज सामाजिक काम करते हे खरंच उल्लेखनीय आहे महिला त्यांचे दुःख त्रास काम करताना त्या कामावर व्यक्त करतात कारण त्रास आणि दुःख आजही कोणा व्यक्तीवर व्यक्त करणे अजूनही महिलांना शक्य नाही कारण आजही महिला बाहेर पडत नाहीत असे मीराताई शिंदे म्हणाल्या. सुनिता ताई दरवडे यांनी संविधानातील स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांचे उदाहरणे देऊन महिलांना सहज समजतील असे सांगितले.
सरपंच मनीषाताई नाहटा , मनीषा काकडे, शकुंतला ताई लगड, संगीताताई घोडेकर, वैष्णवी खलाटे यांनी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी प्रवीण कुमार उर्फ बाळासाहेब नाहटा,डॉ. संतोष ओहोळ, मनेष जगताप , हनुमंत मगर, प्रिया रायमोकर, यांनी विशेष सहकार्य केले.
या कार्यक्रमासाठी मनीषा शेलार , पल्लवी सोनवणे,संध्या काकडे ,मनीषा काकडे ,छाया आढाव ,मंगल तोडकर ,सोनाली काकडे ,पुष्पा खलाटे ,वंदना मगर , सुलभा डांगे,उर्मिला जठार ,संगीता घोडेकर, सविता हिरडे, पूजा डांगे, पुजा लडकत,निलोफर शेख या महिला उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक छाया भोसले यांनी केले आणि प्रस्ताविकेत महिलांना आपण कमी लेखू नये अशी शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्प लता काकडे यांनी केले तर आभार छाया आढाव यांनी मानले.
अशी माहिती संतोष भोसले यांनी दिली.






