न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूल मध्ये महिला दिन आणि बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा 

Google search engine

 

 

न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूल मध्ये ८ मार्च २०२५ रोजी महिला दिनाचे औचित्य साधून “बाल आनंद मेळावा” अंतर्गत “बाजार दिन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . सर्व विद्यार्थी सकाळी १० वाजता शाळेच्या आवारात जमा झाले. या कार्यक्रमाची जाबाबदारी विशाल थोरात सर आणि वायसे सर यांच्याकडे सोपविण्यात आली . शाळेतील शिक्षिका तुलसी मॅडम आणि अभंग मॅडम यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. तसेच पालक प्रतिनिधी अशोक खेडकर आणि छायाताई भैलुमे

यांनी ‘बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन केले. कार्यक्रमाप्रसंगी उगले सर, अबेद झारेकरी आणि परशुराम मांडगे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच योगिता पारखे मॅडम यांनी ‘आनंदाची शाळा ‘ हे

मधुर गीत गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली. सर्व पालकांनी न्यू गुरूकुल इंग्लिश स्कूलच्या बाल आनंद मेळावा या उपक्रमाची स्तुती केली आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.

बाजार दिनाचे छायाचित्रण राजेंद्र कांबळे सरांनी केले. सर्व पालकांनी आणि शिक्षकांनी बाजार दिनाची समृद्धी वाढवली . विद्यार्थ्यांनी दुकानदारांकडून कमिटी गोळा केली. सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांची कौशल्ये विकसित करण्यासाठी ही खरोखर एक अभिनव कल्पना होती. दुपारी १ वाजता कार्यक्रम संपला. तसेच हा बाल आनंद मेळावा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी शाळेचे समन्वयक किरणजी नाईक सर, मुख्याध्यापक शिवाजी पाटील सर , पर्यवेक्षक राजेंद्रकुमार काळे आणि सर्व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.