
स्वातंत्रकाळात स्वातंत्र्यसेनानी कै. आप्पासाहेब जाधव यांनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला, प्रतिकूल परिस्थितीत स्वातंत्र्यासाठी चळवळी केल्या, कुटुंबापासून दूर राहून स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतल्यानेच भारत देश स्वतंत्र झाला असे प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी कोळगाव येथे झालेल्या स्वातंत्र्यसेनानी आप्पासाहेब जाधव यांच्या स्वलिखित जीवन चरित्र च्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू आर्ट्स कॉलेजचे माजी प्राचार्य खासेराव शितोळे तर प्रमुख पाहुणे रयतचे माजी प्राचार्य शिवाजीराव भोर हे होते.
स्वातंत्र्य सेनानी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वातंत्र्यलढ्यातील चळवळीमध्ये महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, पंडित नेहरू यांनी केलेल्या आव्हानानंतर आप्पासाहेब जाधव यांनी स्वतःला स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिले. भाऊसाहेब फिरोदिया सारख्या मातब्बर व्यक्तीचा पराभव करून काँग्रेसचे प्रांतिक सदस्य झाले. सविनय कायदेभंग, भारत छोडो, चले जाव अशा आंदोलनात भाग घेतल्याने त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. येरवडा येथे तुरुंगात असताना त्यांचे खूप हाल झाले तरीही न डगमगता भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले असे या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य खासेराव शितोळे यांनी या प्रकाशन सोहळ्यानिमित्त गौरवद्वार काढले.
या प्रकाशन सोहळ्यात माजी आमदार राहुल जगताप, प्राचार्य शिवाजीराव भोर, प्रा फुलसिंग मांडे, डॉक्टर नारायण गवळी, बी पी बोलगे, हेमंत नलगे, पुरुषोत्तम लगड, दिनकर पंदरकर, अनिता जाधव, उन्नती जाधव, सुजाता जाधव, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास भास्करराव नलगे, दौलतराव नलगे, धनसिंग भोईटे, कुकडी कारखान्याचे संचालक सुभाष लगड, मच्छिंद्र नलगे, विश्वास थोरात, ग्रामपंचायत सदस्य चिमणराव बाराहाते, माजी उपसरपंच नितीन नलगे, गणेश लगड, प्रवीण खेतमाळीस, हेमंत जाधव, सुयश जाधव, दीपक जाधव, गौरव जाधव व जाधव परिवारातील नातेवाईक आणि सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दत्तात्रय जाधव सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महेशकुमार शिंदे यांनी केले.
चौकट
कोळगाव येथे आजी माजी सैनिकांची संख्या मोठी आहे. अनेक सैनिकांनी वेगवेगळ्या युद्धात सहभाग नोंदविला आहे. या सैनिकांचे स्मारक होण्यासाठी कोळगावकरांनी नगर दौंड या राजमार्गावर जागा उपलब्ध करून दिल्यास त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल तसेच अभ्यासिकेसाठी जागा उपलब्ध केल्यास वाचनालयासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन विधानपरिषद आमदार सत्यजित तांबे यांनी दिले. तसेच श्रीगोंदा येथे 75 लाख रुपये देऊनही अद्याप पर्यंत वाचनालय उभे राहू शकले नाही याची खंतही त्यांनी बोलून दाखवली.
चौकट
थोर स्वातंत्र्य सेनानी आप्पासाहेब जाधव यांचे कर्तुत्व खूपच महान असून त्यांनी केलेले कार्य पुस्तक रूपाने जनतेसमोर आणले त्याबद्दल प्राचार्य शितोळे, प्राचार्य भोर, आमदार तांबे, माजी आमदार राहुल जगताप व इतर मान्यवरांनी स्वातंत्र्य सेनानी आप्पासाहेब जाधव यांचे सुपुत्र दत्तात्रय जाधव सर यांचे कौतुक केले .







