
ग्रामविकास शिक्षण संस्थेचे श्री भैरवनाथ विद्यालय निंबवी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध अभ्यासपूरक व अभ्यास इतर उपक्रम राबविले. त्यामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण, विज्ञान प्रदर्शन तसेच आनंदी बाजार भरवण्यात आला सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बाजारात आणून त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान प्राप्तीसाठी गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी विद्यालयाच्या प्रांगणात आनंदी बाजार साजरा करण्यात आला या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक परांडे सर तसेच सरपंच काकासाहेब शिर्के सर्व पदाधिकारी, पालक वर्ग ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांच्या आनंदी बाजारामध्ये सहभाग घेऊन विद्यार्थ्यांचा उत्साह व आनंद वाढविला व सर्वांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच बाजारात आलेल्या सर्व वस्तूंची विक्री झाल्यामुळे विद्यार्थ्यांना झालेला आनंद व आर्थिक देवाण-घेवाण करण्याची संधी मिळाली. या उपक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व सेवक वृंद, पालक व विद्यार्थी यांच्या सहकार्याने आनंदी बाजार हा उपक्रम यशस्वी झाला.






