
पर्यावरण विषयी जागृती व्हावी, या उद्देशाने सहयोग महिला सोशल फाउंडेशन यांनी शहाजीनगर ,कर्जत या ठिकाणी हळदी- कुंकू कार्यक्रम राबविला.
यावेळी हळदी -कुंकू साठी आलेल्या महिलांना, इतर गोष्टींना फाटा देऊन,वाण म्हणून विविध प्रकारच्या रोपांचे वाटप करण्यात आले. मोठ्या आपुलकीने हळदी-कुंकू कार्यक्रमानिमित्त आलेल्या महिलांची संख्या जवळपास दोनशे होती.
समाजात पर्यावरणाचे जतन व्हावे, पर्यावरणाचे महत्त्व समजावे ,पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे होणारे परिणाम हा विषय आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. या दृष्टिकोनातून पर्यावरण पूरक हळदी -कुंकू कार्यक्रम आयोजित केला गेला.
हा अतिशय कौतुकास्पद उपक्रम, या फाउंडेशनच्या अध्यक्षा वंदना संतोष पोटरे, उपाध्यक्ष अनिता राजेंद्र खोरे ,सचिव विमल ज्ञानदेव घालमे,खजिनदार सविता हिम्मत खडके, सदस्या वैशाली विजय खेडकर, अनिता शांतीलाल कदम, रेश्मा नानासाहेब धांडे तसेच शिल्पा माळवे, मनीषा जाधव, प्रिया गुंड ,वैशाली सरडे यांनी राबविला .
या उपक्रमामुळे समाजात पर्यावरणाविषयी आत्मियता निर्माण होण्यास मदत होईल .पर्यावरण रक्षण करणे, समतोल राखणे ही काळाची गरज आहे. पर्यावरण वाचवायचा असेल तर जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजे हा यामागील उद्देश आहे . या कार्यक्रमासाठी जि. प. अहमदनगर माजी. अध्यक्षा मंजुषा गुंड, वंदना गुंड , सुरेखा माने,राणी गदादे,नगरसेविका प्रतिभा भैलुमे ,छायाताई शेलार ,त्याचबरोबर अनेक महिला उपस्थित होत्या. आलेल्या सर्व महिलांचे मनिषा जाधव यांनी आभार मानले.
प्रतिक्रिया
,”जागतिक तापमान वाढ होणे, प्रदूषण वाढणे, नागरिकरण होणे, जंगलतोड, हरितगृह परिणाम, ओझोन थर कमी होणे ,भविष्यात या गोष्टी टाळायच्या असतील तर यावर एकच उपाय म्हणजे जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे होय
वंदना संतोष पोटरे,
अध्यक्षा -सहयोग महिला सोशल फाउंडेशन, कर्जत.






