
रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालयात २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, खजिनदार प्रकाश धांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संतोष भुजबळ, एनसीसी विभागाचे प्रमुख मेजर डॉ. संजय चौधरी, कर्जतचे ग्रामस्थ, तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सकाळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्राचार्यांनी आपल्या भाषणात प्रजासत्ताक दिनाचे महत्व स्पष्ट केले. त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानाची माहिती दिली आणि देशभक्तीचा संदेश दिला. राजेंद्रतात्या फाळके यांचेसमवेत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन सामूहिकरीत्या करण्यात आले.
भारताचे सुपुत्र व कर्जत तालुक्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा दादा पाटील महाविद्यालयाच्या वतीने यानिमित्त सन्मान करण्यात आला. कमल शंकर भोसले (राशीन), आदिनाथ म्हेत्रे (मिरजगाव), कोंढीराम आखाडे (टाकळी खंडेश्वरी) यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. आशिष दादा दळवी (नेटकेवाडी), विशाल बाळासाहेब नवसरे (नवसरवाडी), अजित राजेंद्र शिंदे (शितपुर) यांची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
यानिमित्त पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालय वक्तृत्त्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविल्याबद्दल कु. रोहिणी भुते व मंगळवेढा केसरी कुस्ती किताब मानकरी सोनाली मंडलिक यांचे अभिनंदन करण्यात आले
राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेटच्यावतीने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली .या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशप्रेम आणि एकतेचा संदेश दृढ झाला. महाविद्यालयातील सर्वांनी हा दिवस अत्यंत आनंदात आणि एकजुटीत साजरा केला. समारोपात सर्वांनी एकत्रितपणे भारत माता की जय! अशी घोषणाबाजी केली.






