Google search engine

विधान परिषदेचे सभापती पदी निवडीबद्दल प्रा. राम शिंदे यांचा अरिहंत ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या वतीने चेअरमन श्री.पंकज इंद्रकुमार धोंगडे यांनी सत्कार करून दिल्या शुभेच्छा

 

 

 

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा आज मिरजगाव येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी अरिहंत ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या वतीने चेअरमन श्री.पंकज इंद्रकुमार धोंगडे यांनी प्रा.राम शिंदे साहेब यांची विधान परिषद सभापती पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करून आगामी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच मिरजगाव शहरात आले होते. त्यांचा मिरजगाव शहर ग्रामस्थांच्या  वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने सभापती आमदार प्रा. राम शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी व ग्रामस्थांशी संवाद साधला .या निमित्ताने कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.