अरिहंत पतसंस्थेचे चेअरमन पंकज धोंगडे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना ३ हजार वह्यांचे वाटप

Google search engine

अरिहंत पतसंस्थेचे चेअरमन पंकज धोंगडे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना ३ हजार वह्यांचे वाटप करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी , सलोखा जोपासत प्रत्येक व्यक्तीने वाढदिवस साजरा करून लोकोपयोगी उपक्रम राबवणे ही काळाची गरज बनली आहे.समाजातील गरिब, वंचित विद्यार्थ्यांना मदत करावी  जेणेकरून समाजातील गरजुंना त्याचा फायदा होऊन सामाजिक उपक्रम सर्वांसाठी पथदर्शी ठरेल, असे मत अरिहंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन पंकज धोंगडे यांनी व्यक्त केले.

कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील धोंगडे मार्केटचे संचालक, अरिहंत पतसंस्थेचे चेअरमन पंकज धोंगडे यांचा वाढदिवस अनावश्यक खर्चाला फटा देत विविध सामाजिक उपक्रम राबवत शालेय मुलांसोबत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

आजकालचा वाढदिवस म्हटलं तर केक कापून अवाजवी खर्च करत संगीत लावून मोठ्या थाटामाटात गाजावाजा करत वाढदिवस साजरा केला जातो. परंतु असे न करता सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहणारे युवा उद्योजक अरिहंत पतसंस्थेचे चेअरमन पंकज इंद्रकुमार धोंगडे यांनी वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून कुठलाही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने मिरजगाव परिसरातील नूतन प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरजगाव, विश्वनाथ भाऊ आजबे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिराळ, भारत विद्यालय मिरजगाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुरवपिंप्री, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदे बुद्रुक, न्यु इंग्लिश स्कुल चांदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंभळी,श्री. दत्तयोगीराज बहुद्देशीय सामाजिक शाळा मुळेवाडी आदी शाळेत शालेय विद्यार्थ्यांना तीन हजार वह्यांचे चेअरमन धोंगडे यांच्या हस्ते वाटप करून वाढदिवस साजरा केला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमासाठी भारत विद्यालयाचे चेअरमन डॉ. रमेश झरकर, पतसंस्थेचे जनरल मॅनेजर विजय वतारे, सचिव अमोल सकट, लतीफ तांबोळी, संचालक प्रविण पंडित, अरविंद झांबरे, अजिनाथ शिंदे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक आदी उपस्थित होते.