
विधानसभेच्या सभापती पदावर विराजमान झाल्यानंतर आमदार प्रा. राम शिंदे हे प्रथमच मतदारसंघात दाखल होणार आहेत. त्यांच्या भव्य दिव्य स्वागतासाठी मतदारसंघातील कार्यकर्ते सरसावले आहेत. प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल आज रविवार दि. २९ डिसेंबर रोजी मतदारसंघात भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे.
आज रविवारी सकाळी मिरवणूक कर्जत शहरात निघणार आहे. या मिरवणुकीची भाजपकडून जय्यत तयारी हाती घेण्यात आली आहे. नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार प्रा. राम शिंदे यांची १९ डिसेंबर रोजी एकमताने विधानपरिषद सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर २९ डिसेंबर रोजी सभापती प्रा. राम शिंदे हे प्रथमच कर्जत दौऱ्यावर येत आहेत.
प्रा. राम शिंदे यांच्या भव्य दिव्य स्वागतासाठी भाजपा व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी नियोजन हाती घेतले आहे. दोन्ही तालुक्यात एकाच दिवशी भव्य मिरवणूकीचे भारतीय जनता पार्टी कर्जतच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. आ. प्रा. राम शिंदे यांची विधीमंडळाच्या सर्वोच्चपदी निवड झाल्यामुळे मतदारसंघातील कार्यकर्त्यांसह जनतेमध्ये उत्साह संचारला आहे.






