
अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग व जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार श्रीगोंदा तालुक्यातून संत ज्ञानेश्वर विद्यालय ढवळगाव चे मुख्याध्यापक श्री सुपेकर मधुकर रावसाहेब यांना राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर साहेब व माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस साहेब यांचे हस्ते प्रदान करण्यात आला . शिक्षणासारखे पवित्र क्षेत्रात कार्य करत असताना मधुकर सुपेकर यांनी जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांचे आशीर्वादाने तसेच कै. मच्छिंद्र डोंगरे यांची प्रेरणा , जिद्द , चिकाटी , मेहनत , शिस्त अंगीकारुन संत ज्ञानेश्वर विद्यालय मध्ये कार्य केले आहे विशेष करून ढवळगाव परिसरातील भटकेविमुक समाजातील मुलांना वीटभट्टी कामगार मुले , मुली साखर कारखाना परीसरात उसतोड मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले विज्ञान तंत्रज्ञान मधे सर्वांगीण विकास साधत असताना इस्पायर अवॉर्ड मधे शाळा राष्ट्रीय पातळीवर नेण्याचे कार्य केले आहे. अनेक वेळा १० वी , १२वी निकाल १००% लागले आहेत व केंद्रात विद्यार्थी प्रथम क्रमांक पटकावून गुणवत्ता टिकवण्यासाठी कार्य केले आहे तसेच शैक्षणिक सहल आयोजित केलेल्या आहेत विविध उपक्रम राबविले जातात. आजदेखील विद्यालयात ७०% मुलींचे प्रमाण आहे आशा प्रकारे अनेक उपक्रम राबविले जातात. यावेळी राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर साहेब , माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडुस प्राथमिक शिक्षण विभाग बी जी पाटील , नियोजन विभाग अहिल्यानगर बाळासाहेब बुगे , वेतन अधिक्षक रामदास म्हस्के साहेब मुख्याध्यक संघ अध्यक्ष प्राचार्य सुनील पंडीत माजी शिक्षणाधिकारी अरुण धामणे , कृष्णकांत चौधरी तसेच मुख्याधापक संघ सर्व तालुकाध्यक्ष पदाधिकारी व मुख्याध्यापक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी श्रीगोंदा मुख्याधापक संघाचे अध्यक्ष बंडू मखरे , जिल्हा संघ उपाध्यक्ष बाळासाहेब जंगले , मार्गदर्शक मुख्याध्यापक सचीन लगड , सुनील भोर जुनी पेंशन राज्य कार्यकारणी सदस्य गवळी सर मुख्याधापक जामदार सर वागस्कर सर , मुख्याध्यापक शिर्के सर बाळासाहेब मुठे मुख्याध्यापक परकाळे सर पानसरे सर , मुख्याध्यापक शेलार सर , साळवे सर , पवार सर मुख्याध्यापक जठार सर , भापकर सर , शितोळे सर मुख्याध्यापक इथापे सर , धांडे उपस्थित होते .







