
महात्मा फुले नूतन महाविद्यालयामध्ये दोन दिवसीय निर्भय कन्या अभियान कार्यशाळा संपन्न झाली, या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून संत गजानन महाविद्यालय खर्डा येथील शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. राजू म्हेत्रे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने योगा महत्त्वाचा असून योगसाधना करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले, व मुलींना स्व संरक्षणासाठी प्रात्यक्षिके व प्रशिक्षण दिले.
दुसऱ्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथील प्रा. डॉ. वडवकर सर यांनी आपल्या मनोगतामध्ये महिला सबलीकरणाच्या दृष्टीने शिक्षण महत्त्वाचे असून विद्यार्थिनींनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण बनावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. तानाजी जाधव होते, त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये महिलांचे शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य सुदृढ असणे महत्त्वाचे असून विद्यार्थिनींनी जीवनामध्ये आलेल्या संकटाचा धाडसाने व निर्भयपणे सामना करावा असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. विठ्ठल कासले यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. डॉ. भूषण तागड यांनी तर आभार डॉ. राजेंद्रकुमार देवकाते यांनी मानले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. ए. बी. चेडे, सर्व पदाधिकारी व प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक यांचे मार्गदर्शन लाभले.






