साईकृपा कृषि महाविद्यालय, घारगाव येथे संविधान दिन उत्साहात साजरा

0
124
Google search engine

 

 

श्री दत्तकृपा शैक्षणिक व कृषि ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संलग्न साईकृपा कृषि महाविद्यालय, घारगाव येथे आज दि.२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी साईकृपा कला महाविद्यालय घारगावचे प्राचार्य व व्याख्याते डॉ. विक्रम कांबळे सर हे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. साईकृपा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. निंबाळकर सर हे अध्यक्ष स्थानी होते. यावेळी डॉ. कांबळे सर यांनी संविधान निर्मिती चा संपूर्ण इतिहास व त्यामागील घडामोडी तसेच संविधान उद्देशकेतील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून सांगितला. विद्यार्थी मनोगत मध्ये विद्यार्थीनी संविधानाबद्दल माहिती दिली. तसेच प्राध्यापक मनोगत मध्ये प्रा. निकम सर, दळवी सर, गायकवाड मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा पाठक सर यांनी संविधानाची प्रस्ताविका स्पष्ट केली. अध्यक्षीय मनोगत मध्ये प्राचार्य डाॅ. संविधानाची मुलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्वे स्पष्ट करून, संविधाने सांगितलेली आपली मुलभूत कर्तव्य पारपाडण्याचे आवाहन केले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी दत्तकृपा शैक्षणिक व कृषि ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.श्री दत्तात्रय पानसरे साहेब, सचिव आदरणीय अर्चनाताई पानसरे मॅडम तसेच संस्थेचे रजिस्टार श्री कल्याण शिंदे सर व महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. निंबाळकर सर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.