
पुण्यासारख्या शहरी भागात कामधंदे, व्यवसायासाठी कर्जत – जामखेड तालुक्यातील स्थलांतरीत लोकांना कर्जत- जामखेड चे लोकप्रतिनिधी म्हणून रोहित पवार यांच्या माध्यमातून एक मजबूत आधारस्तंभ मिळाला आहे.येणाऱ्या काळात या लोकांच्या समस्या सोडवण्यावर त्यांनी भर दिला पाहिजे आणि ते नक्की देतील!. तालुक्यातील जवळ जवळ २५००० मतदार हे पुणे या ठिकाणी राहतात. नक्किच शहरी भागात राहणाऱ्या तालुक्यातील नागरिकांसाठी आ.रोहित पवार निवडून येणे गरजेचे आहे. कारण त्यांच्या पवार पॉवर मुळे तालुक्यातील नागरिकांना शहरीभागात कोणत्याही प्रकारच्या अडचणी सोडवण्याची त्यांच्यात धमक आहे! आणि जो जो त्यांच्या संपर्कात जाईल त्यांच्या समस्या नक्की सोडवण्यात ते कटिबध्द राहीले आहेत आणि येणाऱ्या काळात ही राहतील.पुणे येथील हडपसर भागात नागरीकांचा उत्साह दादाच्या मताधिक्यासाठी जास्तीत जास्त आहे. नक्कीच येवू घातलेल्या निवडणुकीत शेगुड गावातून मोठे मताधीक्य मिळवून देवू.
सचिन काळे , मतदार






