सत्यशोधक डॉ. अण्णाभाऊ साठे पहिले ग्रामीण साहित्य संमेलनाचे मिरजगाव येथे आयोजन 

0
227
Google search engine

 

सत्यशोधक डॉ. अण्णाभाऊ साठे पहिले ग्रामीण साहित्य संमेलन मिरजगाव येथे आयोजित करण्यात आले होते. त्या निमित्त संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉ. शंकर शेठ नेवसे यांना उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल उद्योग भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

थोर साहित्यक अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना समर्पित कर्जत तालुका साहित्यप्रेमी मंडळ आयोजित सत्यशोधक डॉ. अण्णाभाऊ साठे पहिले ग्रामीण मराठी साहित्य संमेलन मिरजगाव येथे आयोजित करण्यात आले होते

यावेळी उपस्थित कवी संमेलन अध्यक्ष श्री नितीन चंदनशिवे, तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री वाल्मीक तात्या निकाळजे ,स्वागत अध्यक्ष चैतन्य उद्योग समूह अध्यक्ष सुरेश काका गोरखे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे संयोजक अध्यक्ष श्री तानाजी दादर, कार्याध्यक्ष सुनील गाडे ,उपाध्यक्ष डी डी राऊत आधी उपस्थित होते

यावेळी सद्गुरु कृषी महाविद्यालय मिरजगाव च्या विद्यार्थ्यांची भव्य ग्रंथदिंडी आयोजित करण्यात आली होती सद्गुरू कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझीम ढोल पथक व घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून टाकला

कार्यक्रमाची रूपरेखा साधारण ग्रंथ दिंडी, महापुरुषाचे प्रबोधन, गीते, एकपात्री प्रयोग मी महात्मा फुले बोलतोय, स्नेहभोजन, व्याख्यान, कथा कथन, कवी संमेलन अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन दिवसभर करण्यात आले होते.

यावेळी संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शंकर नेवसे अध्यक्ष कल्याणी ताई नेवसे संस्थेचे सचिव राजेंद्र गोरे सद्गुरु कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे प्रशासकीय अधिकारी श्री सखाराम राजळे संस्थेचे समन्वय प्रा सुरज जाधव प्रा अमोल विधाते प्रा चांगदेव माने प्रा. बाळासाहेब पारखे तसेच महाविद्यालयाची शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते