
आ.प्रा.राम शिंदे साहेब यांना विकासकामांच्या जोरावर बेलगावकर भरभरून मतदान देतील अशी ग्वाही अशोक शिंदे , मा.सरपंच बेलगाव यांनी दिली.यावेळी बोलताना ते म्हणाले आ. प्रा.राम शिंदे साहेब यांनी मंत्री पदाच्या काळात बेलगाव मध्ये जलसंधारणाचे मोठे काम केले .कोणत्याही भागातील शेतीची सुबत्ता ही जल समृद्धीवर अवलंबून असते ,पुरेसे पाणी उपलब्ध असेल तरच तेथील शेती हिरवीगार दिसते हे हेरून आ .राम शिंदे साहेबांनी बंधारे , कोकण ओढा , नाला खोलीकरण केले यामुळे भूजल पातळी उंचावण्यासाठी मोठी मदत झाली .माय मातीच्या समृद्धीसाठी , बळीराजाच्या समृद्धीसाठी , आ.राम शिंदे साहेबांनी भरीव काम केले.
या सर्व विकास कामांमूळे शिंदे साहेबांच्या बळीराजा पाठीशी खंबीरपणे पाठीशी राहणार आहे.जलसंधारण कामांमूळे तालुक्यात एक नंबर उसाचे क्षेत्र आज बेलगाव मध्ये आहे .२०१७ पासून बेलगाव टँकर मुक्त झाले असून याचे श्रेय आ. प्रा.राम शिंदे साहेब यांना जाते . बेलगावसाठी आ. प्रा.राम शिंदे साहेब यांनी दोन विहिरी , दोन पाण्याच्या टाक्या दिल्यामुळे आज नळाद्वारे पाणी येत आहे . आ. प्रा.राम शिंदे साहेब विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर त्यांनी मिरजगाव ते बेलगाव ६.७४ कोटी रुपयांचा सिमेंट क्राँकीट रस्ता दिल्याने आज दळणवळण सुलभ झाले आहे . बेलगाव मध्ये आ.शिंदे साहेबांनी ७० टक्के काम केले असून २०२४ च्या या निवडणुकीत आ.राम शिंदे साहेबांना स्वाभिमानी बेलगाव जनता भरभरून मतदान देतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले , कर्जत जामखेड मतदार संघाची विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यावर आली असून भूमिपुत्र राम शिंदे साहेब यांनी सर्वच बाजुने आघाडी घेतल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य घरातील व्यक्ती अर्थात प्रा .राम शिंदे साहेब यांच्या मागे राहून त्यांनी मतदान करून साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
आ. प्रा.राम शिंदे साहेब हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. सालगड्याचा मुलगा ते आमदार मंत्री असा त्यांचा प्रवास आहे .गोरगरिबांचा नेता अशी त्याची ओळख असल्यामुळे त्यांनी मतदारांचा विश्वास संपादन केला असून होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांचा सामना रोहित पवार या प्रस्थापित शक्ती विरोधात आहे .रोहित पवारांच्या बलाढ्य शक्तीपुढे लढण्यासाठी मतदार संघात कार्यकर्ते एकवटले असून मतदार राजाने आ .राम शिंदे साहेब यांना साथ देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले .






