
आ प्रा.राम शिंदे साहेब यांना पिंपळवाडी गावातून राजेंद्र गुंड यांच्या नेतृत्वाखाली व सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने मोठे लीड देणार असल्याची खात्री उद्योजक भाऊसाहेब आजीनाथ जंजीरे यांनी दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले गेली ४५ वर्ष राजेंद्र काका गुंड यांच्या नेतृत्वाखाली या गटात आम्ही काम करत आहोत.यावेळी आ. प्रा.राम शिंदे साहेब यांना राजेंद्र काका गुंड यांच्या नेतृत्वाखाली मोठे लीड देणार असून सर्व कार्यकर्ते , पदाधिकारी , ग्रामस्थ यासाठी मोठ्या प्रमाणात कठोर मेहनत घेत आहेत. आ. प्रा राम शिंदे यांनी कर्जत जामखेड तालुक्यातील मोठ्या प्रमाणात विकास कामे केली, त्यामुळे येणाऱ्या काळात आ.प्रा.राम शिंदें आमदाराचे नामदार होणार आहेत .त्यासाठी पिंपळवाडी ग्रामस्थ काकांच्या नेतृत्वाखाली प्रा.राम शंकर शिंदे यांना पिंपळवाडी मधून मोठे मत्ताधिक्य देणार असल्याची खात्री त्यांनी यावेळी दिली.
कर्जत जामखेड च्या स्वाभिमानाची , अभिमानाची लढाई असून आ. प्रा.राम शिंदे साहेब हे मोठ्या मतांनी यावेळी निवडून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.गेल्या वेळी भूलथापा मारून जनतेला फसवून आ.पवार विजयी झाले मात्र आता कर्जत जामखेड मतदार संघातील स्वाभिमानी जनता या भूलथापांना बळी पडणार नसून पार्सल माघारी जाणार यात कोणतीही शंका नाही अशी खात्री यावेळी त्यांनी दिली .






