पाटेगाव येथे दलीत वस्ती मध्ये समाज मंदिर व तुळजाभवानी मंदिरा समोर सभा मंडप होणे बाबत आ.रोहीत दादा पवार यांना निवेदन  आण्णाभाऊ साठे मित्र मंडळ पाटेगाव व पंचशील तरुण मंडळ पाटेगाव यांचा आ .रोहीत दादा पवार यांना जाहीर पाठींबा

0
109
Google search engine

 

 

पाटेगाव येथे दलीत वस्ती मध्ये समाज मंदिर व तुळजाभवानी मंदिरा समोर सभा मंडप होणे बाबत आज निवेदन आज लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ , पाटेगाव यांच्या तर्फे आज आ.रोहीत दादा पवार यांना देण्यात आले. पाटेगाव येथे नवसरवाडी रस्त्यालगत दलीत वस्ती असून तेथील लोकसंख्या ५०० इतकी आहे .तरी पाटेगाव येथे दलीत वस्ती मध्ये समाज मंदिर व तुळजाभवानी मंदिरा समोर सभा मंडप होणे साठी निधी द्यावा अशी विनंती यावेळी करण्यात आली .यावेळी आ.रोहीत दादा पवार यांनी ही मागणी मान्य केली असून निवडणूक झाल्यानंतर निधी देण्याचे आश्वासन यावेळी समाज बांधवांना दिले.

 

 

युवक कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

आ.रोहीत दादा पवार यांचे मतदार संघातील कामे व व्हिजन बघून अक्षय प्रभाकर डाडर,  परशुराम मधुकर डाडर , अशोक भाऊसाहेब डाडर , बाळू अण्णा जाधव , विकास अशोक भोसले, अण्णा सर्जेराव डाडर, राजेंद्र महादेव डाडर,रोहिदास शिवाजी तांदळे,सुभाष तांदळे,बाळू साबळे,सागर डाडर, जनार्दन डाडर, कैलास रामा मोरे व सर्व समाज बांधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज आ.रोहीत दादा पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला