
माजी मंत्री भूमिपुत्र प्रा. आ.राम शिंदे साहेब हेच खरे विकासपुत्र असून आ.राम शिंदे साहेब यांना गावातून खंडाळा गोयकरवाडीतून विक्रमी मतदान होणार असल्याचा निर्धार सागर खांडेकर , व्हा.चेअरमन , खंडाळा गोयकरवाडी यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला.यावेळी खंडाळा , गोयकरवाडी गावातील ग्रामस्थ पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की , आ.राम शिंदे साहेब यांनी भैरवनाथ मंदिरासमोर क्राँकिटकरण , अंगणवाडी निधी , ज्योतिर्लिंग मंदिर सभा मंडप ज्योतिर्लिंग मंदिरापुढील पेविंग ब्लॉक , तुळजाभवानी मंदिर सभा मंडप ,स्मशानभूमी , गोयकरवाडी, गावातील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण आदी विकासकामे दिल्याने गावाचा मोठा कायापालट झाला .
माजी मंत्री प्रा .राम शिंदे यांच्या रूपाने मतदार संघात कोट्यवधींचा निधी आणून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. कर्जत तालुक्यातील सर्वच भाग अवर्षणग्रस्त असून वेळेत सुटलेल्या कुकडी आवर्तनाने हा भाग बागायती म्हणून ओळखला जावू लागला आहे. जलयुक्त शिवार , रस्ते , घरकुल, जलसंधारण यामुळे मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला . त्यामुळे खरे विकास पुत्र आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. तूकाई उपसा सिंचन योजना ही पूर्णत्वाला आलेली आहे या योजनेमुळे गावातील पाण्याचा प्रश्न मिटणार आहे याचे श्रेय सन्माननीय आमदार प्रा. राम शिंदे साहेब यांना जाते. आपला तो आपलाच असतो , भूमिपुत्र आ .राम शिंदे साहेब हेच कर्जत जामखेड मतदार संघाला आमदार पाहिजेत.कर्जत तालुक्यातील एमआयडीसी चा प्रश्न सन्माननीय आमदार प्रा .राम शिंदे साहेब यांनी मार्गी लावला आमच्यासारख्या युवकांना त्या एमआयडीसी चा फायदा आणि रोजगार मिळेल . रोजगार मिळाल्यानंतर आमचा युवक युवती हे स्वाभिमानाने कर्जत जामखेड मध्ये या ठिकाणी आपली रोजगार निर्मिती झाल्याने तालुक्यातच उपजीविका भागू शकतील .
तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवार कामामुळे तालुक्याचा कायापालट झाला असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. अहिल्यानगर सोलापूर रस्ता , भिगवन अमरापुर रस्त्यामुळे दळणवळण सुलभ झाले. कर्जत मधील शहरवासीयांच्या उजनी वरून पाईपलाइन आणून पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला. नाला खोलीकरण आदी कामामुळे दुष्काळी परिस्थिती कायमची मिटली व शेतकऱ्यांचे उत्पन्न कमालीचे वाढले व तालुक्याची ओळख बागायती तालुका अशी झाली. आ. प्रा.राम शिंदे साहेब हेच खरे विकास पुत्र आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली .






