सद्य परिस्थितीत तूर पिक व्यवस्थापन

Google search engine

 

यावर्षी तूर पिक अतिशय चांगले आलेले आहे, सद्य परिस्थितीत फुले लागत आहेत, काही ठिकाणी ५० टक्के फुले आणि ५० टक्के शेंगा अशी अवस्था आहे, अशा परिस्थितीमध्ये पाणी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे,

@ पाणी व्यवस्थापन करताना स्प्रिंकलर ने पाणी देणे टाळावे, अशा स्थितीत पाट पाणी दिले तर अधिक फायदा होतो, बरेच शेतकरी सद्या पाणी देणे टाळत आहेत परंतू जर पाणी देण्याची गरज असेल तर पाट पाणी देणे आणि नंतर पाणी न देणे, यात महत्वाचे म्हनजे आताच चांगले पाणी दिले तर नंतर पाणी देण्याची गरज नाही, फक्त पाणी पोटभर देणे आवश्यक आहे त्यामुळे तूर काढणीला एकाचं वेळी येते, आणि जर आपण शेंगा भरताना जास्तीच पाणी दिले तर तुरीला पुन्हा फुले लागतात व त्यामुळे तीजोरा होऊ शकतो त्यामुळे पाणी व्यवस्थापन करताना काळजी घेणे आवश्यक आहे.

@ तुरी मद्ये नैसर्गिक फुल गळ होत असते त्यामुळे घाबरून जावून खर्च वाढवून घेऊ नये, जर जास्तीच फुल गळ होत असेल तर @ Planofix ३ ml किंवा Gebrelic acid 30 ml आणि ०:५२:३४ १०० gm असे फवारणी करावी ( गरज असेल तरच)

शेंगा भरण्याच्या अवस्थेत ०:५२:३४ १०० gm आणि micronutrients ( zinc + boron ) ३०-४० ml आपण वापर करू शकता

@ कीटक नाशक – Emamectin benzoate+ Novaluron ३० ml किंवा

Flubendamide+ Deltamethrin १५ ml

किंवा

Coragen ६-८ ml किंवा

सोबत बुरशी नाशक

Thiophanate methyle ४० gm

किंवा

Hexacanazole ३० ml

किंवा

Propicanazole १५ ml

किंवा

Azoxystrobin+ tebucanazole १५ ml किंवा

Azoxystrobin+ Difenocanazole 12-15 ml

याप्रमाणे फवारणी केल्यास नक्कीच चांगला फायदा होईल.

शेवटच्या फवारणी मद्ये कुठल्याही टॉनिक चा किंवा इतर वाढ करणाऱ्या घटकांचा वापर करू नये, शेवटची फवारणी करताना पोटॅश ( ०:०:५० ) तसेच ( mg+ Ca+ k ) असे काँबिनेशन वापरू शकता.

@ बऱ्याच शेतकरी मित्रांचे कॉल येत आहेत तुरीला पाणी द्यावे का म्हणून तर आपल्या शेतात आपण निरीक्षण करावे, तूर पिक दुपारचे वेळी जर सुकत असेल, जमिनीला भेगा पडत असतील तर नक्कीच पाणी देण्याची गरज आहे, कारण या अवस्थेत पाण्याचा ताण पडला किंवा जमिनीला भेगा पडल्या तर अन्नद्रव्ये उपलब्ध होत नाहीत आणि त्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. त्यामुळे पाणी देण्यास काहीही हरकत नाही फक्त पाणी मोकळे देणे आवश्यक आहे …

 

कृषीदूत : शुभम ढोले 

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न (साईकृपा कृषी महाविद्यालय घारगाव)