माजी मंत्री , भूमिपुत्र प्रा.राम शिंदे साहेब विक्रमी मतांनी विजयी होतील : नानासाहेब मारकड 

Google search engine

कर्जत जामखेडचे भूमिपुत्र माजी मंत्री प्रा.राम शिंदे साहेब हे विक्रमी मतांनी विजयी होणार असून त्यांच्या विजयात हातभार लावण्यासाठी आनंदवाडी , मलठण मधून त्यांना मोठे मत्ताधिक्य देणार असल्याचे नानासाहेब मारकड यांनी प्रतिक्रिया दिली.  तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी. आ .राम शिंदे साहेबांसाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत असे ते यावेळी म्हणाले.

आ.प्रा.राम शिंदे साहेब यांनी जलसंधारण मंत्री असताना व गेली अडीच वर्षात केलेल्या विकासकामांमुळे विकासकामांच्या आधारे बूथ वरून मोठे लीड देणार असल्याची ग्वाही  यांनी दिली.

आ.प्रा.राम शिंदे साहेबांनी आनंदवाडी ( मलठन ) साठी डांबरीकरण , सभामंडप ,  जलयुक्त शिवार आदी मोठी विकासकामे दिली . जलयुक्त शिवार योजनेने आज शेतकरी खुश असून ते आ.प्रा.शिंदे साहेबांना मतदान करून आशीर्वाद देतील. शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पिक विम्याचे पैसे भेटले असल्याने शेतकरी खुश आहेत. लाडकी बहीण योजनेचा गावातील असंख्य महिलां भगिनिंना लाभ भेटला असून लाडक्या बहिणी मतदान रुपी आशीर्वाद आ.प्रा.शिंदे साहेबांना देतील. सुनील काका यादव यांनी शेतकऱ्यांना मदत करत बंद पडलेल्या डीपी चालू करून दिल्या .त्यांनी शेतकऱ्यांची अनेक कामे त्यांनी तत्परतेने करून दिली. त्यामुळे याचा मोठा फायदा आ. प्रा.राम शिंदे साहेब यांना निश्चित होणार असल्याची खात्री त्यांनी दिली. आ.रोहित पवार यांनी कोणताही विकास केलेला नसून शेतकऱ्यांच्या डीपी बंद ठेवण्याचे काम केले. त्यामुळे या परिसरातील शेतकरी देशोधडीला गेला . कंपास पेटी , सायकल , टी-शर्ट असे सामान्य नागरिकांची दिशाभूल करून कुठलाही विकास केलेला नाही. टी-शर्ट वाटल्याने कुठला विकास होत नाही . आता जनतेने आता दाखवून द्या विकास कशाला म्हणतात .

रोहित दादांनी जेवढे आश्वासन दिले त्यातले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही मुलांना रोजगार देतो म्हणले , ड्रायव्हिंग लायसन देतो म्हणले कुठल्याही प्रकारचा रोजगार दिलेला नाही व कुठल्याही प्रकारचं लायसन दिलेले नाही .सामान्य जनतेची त्यांनी दिशाभूल केलेली आहे त्यामुळे रोहित पवार यांचे पार्सल बारामतीला पाठवल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही असा हल्लाबोल त्यांनी यावेळी व्यक्त केला . प्रा .आमदार राम शिंदे साहेब हेच विकासपुत्र असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मतदार राजाने आ.प्रा.राम शिंदे साहेब यांच्या नावसमोरील कमळ या चिन्हापुढील बटन दाबून मतदान करून आपल्या गावचा व तालुक्याचा राहिलेला विकासाचा अनुशेष करण्यासाठी प्रा.आ.राम शिंदे यांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.