
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया A ( आंबेडकर ) या पक्षा कडून करण भाऊ चव्हाण कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातून उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री.दीपक भाऊ निकाळजे, राष्ट्रीय सचिव मा. श्री मोहनलाल पाटील जिल्हा अध्यक्ष मा श्री.निलेश भाऊ गायकवाड ,मा.सचिन भाऊ घोडके जिल्हा उपाध्यक्ष ,मा.नाना सांगळे जिल्हा सचिव मा. गणेश सांगळे जिल्हा संघटक.मा.भगवान गजरमल – तालुका अध्यक्ष , मा.युवराज शिंदे – तालुका सचिव , मा.भाऊसाहेब चव्हाण तालुका उपाध्यक्ष , मा.नामदेव गलांडे – तालुका सहसचिव ,मा.कुलदीप शेलार – तालुका संघटक ,मा.संदीप हरिभक्त – तालुका सहसंघटक , मा.फरीद इनामदार श्रीगोंदा शहराध्यक्ष , मा.नितीन चव्हाण,मा.प्रवीण चव्हाण,दत्ता शिंदे,मा.अजित चव्हाण,मा.महेश थोरात,मा.भीमराव चव्हाण मा.आकाश राजपूत आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी बोलताना करन चव्हाण म्हणाले की कर्जत जामखेड मतदार संघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया A (आंबेडकर ) यांनी मला उमेदवारी दिली असून उद्या मी अर्ज भरणार आहे.
येणाऱ्या काळात कर्जत जामखेड परिवर्तन अटळ असून सर्व कार्यकर्त्यांच्या खंबीर साथीने मी ही निवडणूक लढवणार असून कर्जत जामखेड मतदार संघात कर्जत जामखेड मधील दोन्ही विद्यमान आमदारांच्या विकासकामांतील अपयशामुळे या मतदार संघात बदल निश्चित आहे.






