जनसामान्यांच्या आग्रहामुळे  अंबादास पिसाळ यांनी उमेदवारी करावी डॉ.संदीप बरबडे

Google search engine

 

कर्जत तालुक्यात गेली कित्येक वर्षापासून स्थानिक आमदार नसल्यामुळे विकासाला खीळ बसली असून स्थानिक कर्जत तालुक्यातील उमेदवाराला संधी देण्याची मागणी जोर धरत आहे. कर्जत तालुक्यात तिसरा पर्याय म्हणून जनसामान्याचे नेतृत्व , सर्वसाधारण व्यक्तिमत्व , २४ तास समाजामध्ये मिसळून राहणारा नेता शांत , संयमी अशी ओळख असलेले जिल्हा बँकेचे कर्तुत्ववान संचालक अंबादास पिसाळ हे तिसरा पर्याय म्हणून उपलब्ध राहणार असून त्यांनी उमेदवारी करावी अशी मागणी डॉ.संदीप बरबडे यांनी दिली. कर्जत तालुक्यात विकास करण्यासाठी येथील स्थानिक उमेदवार पाहिजे असून यासाठी अंबादास पिसाळ हे सक्षम उमेदवार आहेत. सर्वसामान्य जनतेतून त्यांच्या उमेदवारीसाठी जोर धरत असून सर्वसामान्य तालुक्यातील जनता प्रचंड आग्रही आहे . त्यांना पंचायत समिती , जिल्हा परिषद , सहकारी बँक आदींचा दांडगा अनुभव असल्यामुळे बप्पाजींचे तळागाळातील कार्यकर्त्यांची नाळ जोडलेले आहे तसेच या गोष्टीचा कधीही ते बडेजावपणा करत नाहीत . मोठ्या धनशक्ती विरोधात ते तालुक्यातून उभे ठाकले असून ते उमेदवार असल्यास विजय निश्चित असल्याची ग्वाही डॉ.संदीप बरबडे यांनी दिली.