
कर्जत जामखेड मधील मतदारांनी आ.प्रा.राम शिंदे साहेबांना मतदान करून आपल्या गावचा व तालुक्याचा विकासाचा अनुशेष करण्यासाठी प्रा.आ.राम शिंदे यांना मतदान करण्याचे आवाहन अजय दळवी यांनी केले आहे.
माजी मंत्री प्राध्यापक आमदार राम शिंदे साहेब यांना तिखी येथील कोकण ओढ्यातील बंधाऱ्यात पाणी सोडण्यासाठी निवेदन दिले असता त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना पाणी सोडण्यास सांगितले होते
त्यानंतर अधिकाऱ्यांना चाऱ्या दुरुस्तीसाठी मशीन देण्यास सांगितले असता दोन दिवस मशीनने चारी दुरुस्त करून बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले व आज सर्व बंधारे पूर्ण भरून ओसंडून वाहत आहेत.
या कोकण ओढ्यावरील बंधारे बांधण्यासाठी आमदार प्रा राम शिंदे साहेब यांनी सुमारे दीड कोटी रुपये निधी देऊन बंधारे बांधण्यात आले आहेत.शेवटी आपला तो आपलाच असतो . आपल्या मातीच्या विकासासाठी अखंड संघर्ष आणि वचनबद्धता. आपल्या जनतेच्या हक्कांसाठी,कर्जत जामखेडच्या उन्नतीसाठी आता कोणतीही माघार नाही. हे रण पुन्हा उभे राहण्याचे, आपल्या मातीच्या सन्मानाचे असून भूमिपुत्राचा एल्गार , आपला तो आपलाच असतो हे त्यांनी ग्रामविकास करून दाखवून दिले आहे .
ते यावेळी बोलताना म्हणाले , भूमिपुत्र आमदार राम शिंदे साहेबांना विधानसभेची उमेदवारी रविवारी जाहीर होताच आ. प्रा.राम शिंदे साहेब यांच्या विजयाचा संकल्प केला .
यावेळी बोलताना ते म्हणाले की , आमदार प्रा राम शिंदे यांनी जनतेचा सेवक म्हणून काम केले. त्यामुळे पक्षाने त्यांना सलग चौथ्यांदा उमेदवारी बहाल केली. निवडणुकीसाठी मोठ्या ताकदीने कामाला लागा, बुध्दीने ही निवडणूक लढवा, कर्जत जामखेडच्या स्वाभिमानासाठी आणि आपल्या मातीतल्या भूमिपुत्राला जिंकून आणण्यासाठी जोमाने कामाला लागा असे आवाहन त्यांनी केले.
आपला तो आपलाच असतो ,स्थानिक नेते , कार्यकर्ते यांच्या स्वप्नांचा आ.रोहित पवार यांनी केलेला भ्रमनिरास यामुळेच आ.राम शिंदे यांना आपला तो आपलाच असतो असे म्हणत सर्व नेत्यांनी एकत्र येत प्रेमळ,शांत,संयमी,असलेल्या प्रा. राम शिंदे यांना साथ दिली पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले






