
नागेश विद्यालय प्राध्यापक कैलास नरसिंग वायकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेल महाराष्ट्र राज्य संघटक पदी निवड झाल्याबद्दलचे अधिकृत पत्र राष्ट्रवादी काँग्रेस कर्जत जामखेड लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार यांच्या शुभहस्ते देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलचे प्रदेशाध्यक्ष मा.आमदार दिलीप रावजी सोनवणे साहेब प्रदेश सचिव डॉ दिलीपराव सूर्यवंशी साहेब,उपाध्यक्ष श्री काकासाहेब देशमुख साहेब, प्रदेश प्रवक्ते प्रशांत खामकर सर मान्यतेने निवड करण्यात आली.
निवडीनंतर राज्य पातळीवरील शिक्षकांचे संघटन ,शिक्षकांच्या समस्या, अडी अडचणी याच्यासाठी मनापासून काम करणार असल्याचे मत प्रा.कैलास वायकर यांनी व्यक्त केले.
यावेळी शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे ,प्राचार्य भगवानराव मडके साहेब, माजी प्राचार्य दिलीपराव ढवळे साहेब, पारनेर सैनिक बँकेचे संचालक दत्तात्रेय सोले पाटील, शिक्षक सेलचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब येवले सर,सचिव श्री बाबूराव शिंदे सर,प्रा. शाम बारस्कर व सहकारी शिक्षक उपस्थित होते.







