
महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करणे साठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही योजना कार्यान्वित केलेली आहे . त्यांच्या प्रभावी अंमलबजावणी साठी ११ सदस्यीय कमिटी करणेत आली आहे त्यामध्ये ३ अशासकीय सदस्यांचा समावेश करणेत आला आहे .
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रभावी अंमल बजावणी साठी विधान सभा क्षेत्र निहाय ११ जणांची समिती गठित करण्यात आलेली आहे . त्यामध्ये ३ अशासकीय सदस्य आहेत तर कर्जत जामखेड च्या अध्यक्षपदी आ.प्रा.राम.शिंदे साहेब यांची निवड करण्यात आलेली आहे तर दोन अशासकीय सदस्य म्हणून अभिनंदन साहेब, सार्थ निवड सर्व बहिणींना दिलासा .
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रभावी अंमल बजावणी साठी विधान सभा क्षेत्र निहाय ११ जणांची समिती गठित करण्यात आलेली आहे . त्यामध्ये ३ अशासकीय सदस्य आहेत तर कर्जत जामखेडच्या अध्यक्षपदी आ.राम.शिंदे यांची निवड करण्यात आलेली आहे तर दोन अशासकीय सदस्य म्हणून श्री धनंजय मोरे खेड, कर्जत व श्री बापूराव ढवळे पिंपरखेड ता जामखेड यांची निवड करणेत आली आहे . न्यायालयाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेच्या विरुद्धची याचिका फेटाळली आहे . रक्षाबंधन पासून या योजेनेची खात्यावर पैसे जमा करून अंमल बजावणी सुरु होईल .
कर्जत जामखेड च्या अध्यक्षपदी आ.राम शिंदे यांची निवड झाल्याने सर्व स्तरातील लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे कोणावरही अन्याय होणार नाही त्यामुळे या निवडीमुळे सर्व महिला भगिणी मध्ये आनंदाचे वातावरण आहे . सर्वांनी या निवडीचे स्वागत केले आहे
अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष खरमरे यांनी दिली .







