काँग्रेस नंतर उद्धव सेनेचाही आ.रोहित पवारांना विरोध  कर्जत जामखेड मतदार संघात २०२४ ला भगवा फडकणार : बळीराम यादव 

Google search engine

काँग्रेस नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षानेही आ.रोहित पवार यांच्या विधानसभा उमेदवारीला तीव्र विरोध केला आहे.

 

 

 

रेहकुरी ता.कर्जत येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची बैठक पार पडली.यावेळी आ.रोहित पवार यांच्या विधानसभा उमेदवारीला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने तीव्र विरोध केला आहे. रेहकुरी येथे खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. तालुकाप्रमुख बळीराम अण्णा यादव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी आगामी विधानसभेच्या निवडणूकी विषयी प्रामुख्याने चर्चा झाली. तालुकाप्रमुख बळीराम अण्णा यादव यांनी बोलताना असे म्हटले की येणाऱ्या काळामध्ये पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी २८८ जागी उमेदवार देण्याचे ठरवले तरी आमच्याकडे कर्जत जामखेड मध्ये सक्षम असा उमेदवार असून कर्जत जामखेड मध्ये तो भगवा फडकवील्याशिवाय रहाणार नाही तसेच महाविकास आघाडी धर्म पाळण्याचा मातोश्रीवरून आदेश आले तरी ते देखील पाळण्याचे काम कर्जत तालुक्यातील शिवसेना करेल असे जाहीर केले.

उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आमदार रोहित पवार यांच्या कार्यपद्धतीवर संताप, नाराजी व्यक्त करताना असे म्हणाले की आमदार रोहित पवार यांनी कर्जत तालुक्यातील शिवसेनेबाबत कधीही आघाडी धर्म पाळला नाही. शिवसेनेच्या तालुकाप्रमुखांनी असो किंवा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी सुचवलेली विकास कामे केली नाहीत. सत्ता असताना देखील, शिवसेनेच्या मंत्र्यांकडून निधी आणून मंत्र्यांना निमंत्रित करून कामाची उद्घाटने करताना देखील तालुक्यातील शिवसेनेला कधीही साधे निमंत्रण देण्याचे कष्ट आमदार साहेबांनी घेतले नाहीत.कर्जत नगरपंचायत ला एकही जागा दिली नाही, कर्जत नगरपंचायत निवडणुकीत देखील शिवसेना पदाधिकाऱ्यांना त्रास देऊन उमेदवारी अर्ज बाद केली मागे घेण्यास भाग पाडले. आमदार रोहित पवारांनी कर्जत तालुक्यातील शिवसेनेचे नेहमीच खच्चीकरण करण्याचे काम केले आहे. मुंबईला शिवसेना पक्षश्रेष्ठी बरोबर सलोख्याचे संबंध ठेवायचे आणि कर्जत तालुक्या मध्ये शिवसेनेला दुय्यम दर्जाची वागणूक देण्याचे काम आमदारांनी केले आहे. असे अनेक संताप जनक आरोप शिवसेनेचे पदाधिकारी यांनी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बळीराम अण्णा यादव यांच्यापुढे केले.ता. प्रमुख बळीराम अण्णा यादव बोलताना म्हणाले की कर्जत तालुक्यामध्ये शिवसेनेचे पूर्वीपासून मुळे घट्ट आहेत. प्रत्येक गावात शाखा आहे. शिवसैनिक आहेत आणि ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यामुळेच विक्रमी मताने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला विजय झालेला आहे. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय कर्जत जामखेड चा आमदार होण्याचे दिव्य स्वप्न कोणी पाहू नये. तालुक्यातील शिवसैनिक पदाधिकाऱ्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार. आमदारांनी शिवसेनेला योग्य ती वागणूक द्यावी. महा आघाडीचा धर्म पाळावा यासाठी वरिष्ठांना देखील सांगण्यात येईल. असे तालुकाप्रमुख यादव यांनी म्हटले आहे.

 

बैठकीवेळी उपस्थित तालुकाप्रमुख बळीराम अण्णा यादव , महेश भैय्या तोरडमल उप तालुका प्रमुख, सुभाष जाधव उपतालुकाप्रमुख, चंदू घालमे उप तालुकाप्रमुख ,शिवाजी बापू नवले उप तालुकाप्रमुख ,अविनाश मते युवा सेना तालुकाप्रमुख ,नाजीम भाई काजी राशीन शहर प्रमुख ग्रामपंचायत सदस्य , दीपक गांगर्डे उपतालुकाप्रमुख युवा सेना ,सुभाष सुद्रिक विभाग प्रमुख,अक्षय तोरडमल सर कर्जत शहर प्रमुख ,अजित कानगुडे उप तालुकाप्रमुख , लखन जगताप ग्रामपंचायत सदस्य नांदगाव, संदीपान लोंढे संघटक, नंदू पवार युवा सेना शाखाप्रमुख नांदगाव , अमोल सुपेकर विभाग प्रमुख , प्रा.पौरष जाधव तालुका प्रसिद्धी प्रमुख,विभाग प्रमुख , संदीप मोरे विभाग प्रमुख , मोहन घालमे विभाग प्रमुख,पोपट धनवटे विभाग प्रमुख, महेंद्र धोदाड विभाग प्रमुख आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.