केतुर-१ ते केतुर-२ रस्त्याचे मुरमीकरण  आमदार नारायण आबा पाटील, पृथ्वीराज भैय्या पाटील यांच्यासह सरपंच , उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य शहाजी बापू पाटील , प्रवीण अनिल खटके , आ.नारायण आबा पाटील समर्थक  यांचे ग्रामस्थांनी मानले आभार

Google search engine

वेदिका राजेंद्र खटकेच्या मागणीला मान्यता देऊन ग्रामपंचायात केत्तूर यांनी केत्तूर 2 व केत्तूर 1 ला जाणाऱ्या रोड वर मुरूम टाकला. ग्रामपंचायत सदस्य शहाजी बापू पाटील यांनी विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याने आज रोजी पृथ्वीराज भैय्या पाटील यांनाही फोन केला असता तात्काळ मुरूम चोपण्याचे कामकाज झाले असल्याने केतुर मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज ग्रामपंचायत प्रशासनाने केतुर-१ ते केतुर-२ रस्ता मुरमीकरण करून रोलरने चोपून घेतला असून यामुळे रस्ता व्यवस्थित तयार झाला असून यामुळे या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी , शेतकरी , विद्यार्थी यांचा प्रवास सुलभ होणार आहे.

ग्रामपंचायत केतूर यांनी या रस्त्याचा प्रश्न ग्रामस्थांच्या मागणीनुसार तात्काळ सोडवत मुरुमीकरण केले आहे. यामुळे शेतकरी , दूध उत्पादक शेतकरी, विद्यार्थी यांचा प्रवास सुलभ होणार आहे. पावसामुळे या रस्त्यावरून येणे जाणे जिकिरीचे झाले होते. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ दखल घेत रस्त्यावरती मुरूम टाकून रोलरच्या सहाय्याने व्यवस्थित चोपून घेतला आहे. रस्ता दुरुस्तीबद्दल ग्रामपंचायतचे सर्व गावकरी यांनी आभार मानले आहेत.