चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील 62 विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीमधे प्लेसमेंट सेल द्वारे नोकरीसाठी निवड

Google search engine

 

चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील 62 विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीमधे प्लेसमेंट सेल द्वारे नोकरीसाठी निवड झाली

शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे चांदमल ताराचंद बोरा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील 62 विद्यार्थ्यांची रांजणगाव पंचतारांकित एमआयडीसी मधील हायर अप्लायन्स या बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीसाठी निवड झाली आहे .

बोरा महाविद्यालयात कला , वाणिज्य विज्ञान सह संगणक व व्यवस्थापन या शाखातून विद्यार्थ्याना शिक्षण घेता येते .

यापूर्वी महाविद्यालयातील कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मधुन विद्यार्थ्यांची अनेक कंपन्या मध्ये निवड झालेली आहे.

विशेष म्हणजे तृतीय वर्ष BA ,Bcom, B.Sc, BBA, BCA शाखेच्या निकालापूर्वीच विद्यार्थ्यांच्या झालेल्या निवडीमुळे विद्यार्थ्यांसह पालकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. काकासाहेब मोहिते यांनी सांगितले.

या निवडीबद्दल महाविद्यालय नियामक मंडळाचे अध्यक्ष उद्योजक मा.प्रकाश धारिवाल, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा, संस्थेचे सचिव मा.नंदकुमार निकम, संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते आदीनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे . सदर प्लेसमेंट ड्राईव्ह यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. हरिदास जाधव तसेच प्लेसमेंट सेल विभागाचे समन्वयक डॉ. योगेश सेठी व समिती सदस्य यांनी परिश्रम घेतले.