साईकृपा कृषि महाविद्यालय, घारगाव येथील माजी विद्यार्थीनी कु.शितल खेडकर यांची स्टेट बॅक इंडिया मध्ये कनिष्ठ सहयोगी अधिकारी पदी निवड

Google search engine

 

श्री दत्तकृपा  शैक्षणिक व कृषि ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संलग्न, साईकृपा कृषि महाविद्यालय, घारगाव येथील माजी विद्यार्थीनी कु. शितल खेडकर यांची आय बी पी एस या बॅकिंग परिक्षा बोर्ड ने घेतलेल्या बॅकिंग परिक्षेमध्ये उत्कृष्ठ असे यश संपादन करत स्टेट बँक ऑफ इंडिया या नामांकित बँक मध्ये कनिष्ठ सहयोगी अधिकारी या पदी निवड झाली आहे.

कु. शितल खेडकर या मुळ श्रीगोंदा येथील रहिवासी असुन बारावी नंतर त्यानी साईकृपा कृषि महाविद्यालय, घारगाव येथुन २०१७ ते २०२१ या कालावधीत त्यांनी कृषि पदवीचे शिक्षण त्यांनी प्रथम श्रेणी मध्ये पुर्ण केले त्यानंतर पदवीच्या अंतिम वर्षापासुनच बॅकिंग क्षेत्रातील स्पर्धा परिक्षा देण्यास सुरूवात केली. त्यानंतर स्वयंअध्ययन पद्धतीने तयारी करत बॅकिंग परिक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. साईकृपा कृषि महाविद्यालय, घारगाव येथील प्राचार्य डाॅ. निंबाळकर सर यांनी त्यांचे हे यश हे आजच्या विद्यार्थींना विशेष मार्गदर्शक ठरेल असे संबोधून कु. शितल खेडकर यांचे अभिनंदन केले.

दत्तकृपा शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष मा.श्री. दत्तात्रय पानसरे साहेब, सचिव अर्चनाताई पानसरे मॅडम व रजिस्टार श्री. कल्याण शिंदे सर यांनीही कु. शितल खेडकर यांच्या उज्ज्वल यशाबद्दल अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.