
घारगाव येथील सावित्रीबाई फुले निवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणशास्त्र महाविद्यालय (बी.एड. व एम.एड) घारगाव यांच्या वतीने आयोजित “एक मुठ्ठी अनाज की” या सामाजिक उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे मोठ्या प्रमाणावर धान्य संकलित करून शाळेला देण्यात आले.
या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले निवासी आश्रम शाळा संस्थेचे अध्यक्ष श्री. पोपटराव खामकर, खामकर मॅडम, तसेच शाळेचे शिक्षक उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत, त्यांच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री दत्तकृपा शैक्षणिक व कृषी ग्रामविकास प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. दत्तात्रय पानसरे साहेब, सचिव सौ. अर्चनाताई पानसरे, बी.एड कॉलेजचे प्राचार्य डॉ. मच्छिंद्र गोंटे,खेंडके पी. झेड सर, शिंदे सर, शेलार सर, कोळेकर सर,शिंदे सर ,होले सर,आहेर सर,भोईटे मॅडम,व सर्व शिक्षकवृंद यांचे आभार मानले.
कार्यक्रमात शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि दातृत्वाची भावना बळावली.
यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि उपस्थित शिक्षकांना या उपक्रमाची महत्त्वाची भूमिका कशी असू शकते याचे महत्त्व सांगितले आणि या प्रकारे विद्यार्थ्यांनी समाजाप्रती आपली जबाबदारी पूर्ण केली, असे सांगण्यात आले.







