
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ, रोशीनी ॲक्शन फॉर इम्पॅक्ट फाउंडेशन, नागरिक विकास अध्ययन संस्था पुणे व ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, शारदाबाई पवार महिला आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, शारदानगर-बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राज्यस्तरीय स्वयंसिद्धा युवती संमेलन, २०२५ मध्ये ‘आमच्या महाविद्यालयातील सर्वोत्कृष्ट उपक्रम – अखिल भारतीय स्त्रीशिक्षिका साहित्य संमेलन’ या उपक्रमासाठी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सचिव व विश्वस्त सौ. सुनंदाताई पवार, प्राचार्य डॉ. प्राचार्य डॉ. एस. व्ही. महामुनी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दादा पाटील महाविद्यालयाला नुकतेच गौरविण्यात आलेले आहे. या उपक्रमाचे सादरीकरण दिक्षा बबन गेळे व गायत्री जायभाय यांनी केले. या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. संजय नगरकर, डॉ. दिग्विजय कुंभार, प्रा. सुखदेव कोल्हे यांनी मार्गदर्शन केले
दादा पाटील महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने दरवर्षी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ‘अखिल भारतीय स्त्रीशिक्षिका साहित्य संमेलन’ आयोजित केले जाते. स्त्रीशिक्षकांसाठी आयोजित केले जाणारे हे भारतातील पहिले संमेलन आहे. प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या अभिनव प्रयोगातून सदर संमेलन दरवर्षी यशस्वीपणे आयोजित केले जाते.
स्वयंसिद्धा युवती संमेलनामध्ये दादा पाटील महाविद्यालयाच्या उपक्रमाचा केलेल्या गौरवाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार व अंबादासजी पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य राजेंद्र निंबाळकर, बप्पाजी धांडे, माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.







