
धालवडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी आज तात्यासाहेब दादू चव्हाण यांची निवड झाली. ग्रामपंचायत कार्यालय , धालवडी येथे ही निवड प्रक्रिया पार पडली.
यावेळी सभेला सरपंच रेखा पोपट पवार , ग्रामपंचायत सदस्य कमल कैलास चौधरी , प्रभाकर निवृत्ती सुपेकर , मच्छिंद्र मोहन खोडवे , रेखा हनुमंत पवार , साखर बाई दत्तू तांबे आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
यावेळी दत्तात्रय चौधरी,नागेश चौधरी , अतुल चौधरी , सुरेश अण्णा खोडवे , शरद तांबे , विजय चव्हाण , कांतीलाल खोडवे , अशोक चौधरी ,पोपट पवार उपस्थित होते.
यावेळी बोलताना नवनियुक्त उपसरपंच तात्यासाहेब चव्हाण म्हणाले , येणाऱ्या काळात धालवडी गावचा सर्व ग्रामस्थांना बरोबर घेवून सर्वसमावेशक विकास करणार असून मूलभूत , गरजा , सुविधा आदी बाबींवर काम करणार आहोत.उपसरपंच निवडीबद्दल उपसरपंच तात्यासाहेब चव्हाण यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.







