प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धटेक, देऊळवाडी येथे समाजसेवक सोमनाथ भाऊ खोमणे यांच्या तर्फे शालेय साहित्य वाटप 

Google search engine

 

आज भारतीय प्रजासत्ताक दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आज 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिनानिमित्त समाजसेवक सोमनाथ भाऊ खोमणे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , सिध्दटेक, देऊळवाडी येथे अंगणवाडी ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अंकलिपी , शालेय साहित्य वाटप केले. यावेळी शिक्षक , विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले , सामाजिक उपक्रम राबवत आजचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा मानस होता. हे शालेय साहित्य नसून मुलांच्या भविष्याचे दरवाजे उघडणारे चाव्या आहेत”.

या अंकलिपी आणि पेनच्या माध्यमातून आपले लहान मुले आपले विचार व्यक्त करण्यास नवीन गोष्टी शिकण्यास आणि आपल्या कल्पना शक्तीला उड्डाण देण्यास सक्षम होतील,   सिद्धिविनायक चरणी हीच प्रार्थना करतो की माझ्याकडून असेच सत्कर्म घडो अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.