अळसुंदे हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन अभिनव पद्धतीने साजरा

Google search engine

 

रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल अळसुंदे विद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी पालक व ग्रामस्थांना स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचे योगदान,लोकशाही प्रजासत्ताक व्यवस्था यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी निबंध , वक्तृत्व , रांगोळी, गीत गायन, कविता वाचन, समूह नृत्य, वैयक्तिक नृत्य इत्यादी देशभक्तीपर विषयावरील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील सर्व विजेत्या स्पर्धकांना आकर्षक प्रमाणपत्रांचे वितरण सर्व मान्यवर अतिथींच्या हस्ते करण्यात आले.

इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये महिलांचे महत्वपूर्ण स्थान असणाऱ्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महाराणी ताराबाई,स्वराज्य जननी जिजाऊ मासाहेब , सईबाई भोसले, झाशीची राणी लक्ष्मीबाई, थोर समाजसेविका मदर तेरेसा यांच्यासह भारत मातेची भूमिका बजावणाऱ्या ऐतिहासिक,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्वांचे मूर्त रूप अनुक्रमे अनुजा आढाव, श्रावणी वाघमारे, प्रतीक्षा साळुंके, प्रतीक्षा कांबळे, जान्हवी साळुंके, समीक्षा अनारसे, श्रद्धा शेटे आणि शिवानी साळुंके या विद्यार्थिनींनी साकारले हे प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले.

या राष्ट्रीय उत्सवासाठी एकनाथ गदादे, भानुदास गार्डी व इतर सर्व शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते. आळसुंदे गावातील दानशूर व्यक्तिमत्व मोहन गदादे, सुलोचना अनारसे, संतोष गाडे, सर्जेराव मोहोळकर, रेवणनाथ अनारसे, एकनाथ गदादे, छगन अनारसे, सर्जेराव गदादे यांनी विद्यार्थ्यांना स्वखर्चाने खाऊचे वाटप केले.

पालक आणि शिक्षक यांच्या प्रयत्नांना साथ देऊन आपले, कुटुंबीयांचे, समाजाचे आणि देशाचे नाव उज्वल करण्याचे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक अभंग सर यांनी केले.

विद्यालयाच्या शैक्षणिक व भौतिक प्रगतीचे साक्षीदार असलेले जेष्ठ शिक्षणप्रेमी भानुदास गार्डी यांनी ग्रामीण भागातील उत्कृष्ट संस्कार केंद्र असलेल्या विद्यालयाच्या व्यवस्थापनाचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख सुनील गोरखे यांनी केले तर ज्येष्ठ शिक्षक मोहन बनसुडे यांनी उपस्थित मान्यवरांचा ऋणनिर्देश व्यक्त केला.

विद्यालयातील विद्यार्थी शैक्षणिक, कला क्रीडा सांस्कृतिक या सर्व क्षेत्रात पारंगत व्हावेत यासाठी शालेय व सहशालेय उपक्रम नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वी सादरीकरण करणारे मुख्याध्यापक रामदास परहर, सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनील गोरखे, विद्यालयातील तज्ञ शिक्षक मोहन बनसुडे, रवींद्र विधाते, प्रवीण कांबळे, माधवी सुरवसे आणि नितीन जगताप यांचे अळसुंदे देमनवाडी व पंचक्रोशीतील सर्व शिक्षणप्रेमी नागरिकांनी कौतुक केले.