
माजी मंत्री आ.प्रा.राम शिंदे साहेब तसेच जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ तसेच मार्केट कमिटीचे संचालक मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व शेतकरी संघटनेचे नेते लालासाहेब सुद्रिक , खरेदी विक्री संघाचे संचालक माजी सरपंच सतीश सुद्रिक , माजी सरपंच बंकट नाना सुद्रिक , शेतकरी संघटनेचे नेते शिवाजीराव सुद्रिक यांच्या नेतृत्वाखाली कोपर्डी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी शामराव सुद्रिक तसेच व्हा.चेअरमन पदी बबन चव्हाण यांची निवड आज करण्यात आली . यावेळी माजी चेअरमन लालासाहेब सुद्रिक , माजी चेअरमन श्रीकांत सुद्रिक , चेअरमन नारायण सुद्रिक सोसायटी संचालक मोहन सुद्रिक , राजश्री सुद्रिक , तारामती सुद्रिक यांच्या सहकार्याने निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी संतोष कानडे , बाळासाहेब सुद्रिक , लक्ष्मण कानडे , पंडित सुदाम , सुद्रिक मनोहर , सुद्रिक विजय , सुद्रिक परशुराम , सुद्रिक नवनाथ , सचिन सुद्रिक आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते सहाय्यक निबंधक सूर्यवंशी साहेब , निवडणुक अधिकारी नितीन शेलार सचिव साहेब आदींनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
यावेळी बोलताना नवनियुक्त चेअरमन शामराव सुद्रिक म्हणाले , येणाऱ्या काळात विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी केंद्र बिंदू मानून काम करणार आहे.नवनियुक्त चेअरमन , व्हा.चेअरमन यांचे माजी मंत्री आ.प्रा.राम शिंदे साहेब तसेच जिल्हा अंबादास पिसाळ तसेच मार्केट कमिटीचे संचालक मंगेश जगताप यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.







