कर्जत ते शिंदेवाडी रस्त्याचे काम त्वरित सुरू करा , सरपंच अनिल खराडे यांचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन 

0
384
Google search engine

 

 

 

कर्जत ते शिंदेवाडी रस्त्याचे काम त्वरित सुरू करणे बाबतचे निवेदन कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री सडक विभाग , अहिल्यानगर यांना कापरेवाडी, शिंदेवाडीचे सरपंच अनिल खराडे यांनी आज दिले.यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,आपल्या कार्यालयाकडून कर्जत शिंदेवाडी या रस्त्याचे काम ऑक्टोबर २०२३ मध्ये ठेकेदाराला देण्यात आलेले आहे .माननीय श्री राम शिंदे साहेब यांच्या प्रयत्नातून दीड वर्षापूर्वी हा रोड मंजूर झालेला आहे. यासाठी तीन कोटी ५० लाख रुपये निधी आ . प्रा.राम शिंदे साहेबांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला आहे.तरी ठेकेदाराने हे काम जाणूनबुजून रखवडेलेले आहे .रस्त्याची अवस्था खूप बिकट झालेली आहे त्यामुळे शिंदेवाडी, खंडाळा, टाकळी खंडेश्वरी या गावातील विद्यार्थ्यांना, नागरिकांना, व्यावसायिकांना खूप अडचण सहन करावी लागत आहे . आपणास आमदार प्रा.राम शिंदे साहेब यांनीही त्वरित काम सुरू करण्याचे गेल्या महिन्यात सुचित केले होते परंतु त्याची दखल घेतलेली नाही. हे काम त्वरित चालू करावे व नागरिकांची गैरसोय तसेच अपघात टाळावे. भविष्य रस्ते खराब असल्याने अपघात झाल्यास आपण जबाबदार असणार आहेत याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.