कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातून आ. प्रा.राम शिंदे विजयी होतील , नाथभक्त पुजारी रोहिदास बोरुडे महाराज यांचे भाकीत

0
1104
Google search engine

 

कर्जत तालुक्यातील कोळवडी येथील दत्त मंदिर , नवनाथ मंदिर येथे असलेले नाथ भक्त पुजारी रोहिदास बोरुडे यांनी कर्जत जामखेड मतदार संघाचे भाकीत वर्तवले असून यापूर्वी पावसाचे अनेकदा त्यांनी भाकिते वर्तविले होते ते खरे ठरले होते. मंदिरात नामस्मरण आणि चिंतन करून ते भाकीत वर्तवतात. २०२४ मध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदार संघातून महायुतीचे उमेदवार आ.प्रा.राम शिंदे हे विजयी होतील असे भाकीत रोहिदास बोरुडे यांनी व्यक्त केले आहे. याशिवाय महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार असल्याचे ही त्यांनी भाकीत केले आहे. मतदानाच्या दोन  दिवस अगोदरच त्यांनी हे भाकित केले होते मात्र आपल्यामुळे कोणाला नुकसान पोहोचू नये अथवा कोणाला फायदा होऊ नये यादृष्टीने हे भाकीत मतदान झाल्यानंतर प्रसिद्ध करावे अशी विनंती त्यांनी केली होती.