तरडगाव सरपंच पदी आज शरद बिभीषण देवकाते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सभेला श्री शिवाजी लक्ष्मण केसकर , पिंटू शिवाजी देवमुंडे, शरद बिभीषण देवकाते सौ संगीता वैजनाथ केसकर सौ गंधाराबाई भरत केसकर आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते . सौ बारकाबाई भरत देवमुंडे , दराबाई विश्वनाथ केसकर या सदस्या गैरहजर राहिल्या. निवडणूक अभ्यासी अधिकारी म्हणून बी.के.शेळके यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली. याचबरोबर ग्रामपंचायत अधिकारी निंबोरे भाऊसाहेब व ग्राम महसूल अधिकारी खंडागळे मॅडम उपस्थित होते.
यावेळी बोलताना नूतन सरपंच श्री शरद देवकाते म्हणाले की येणाऱ्या काळात गावाचा सर्वसमावेशक विकास करणार असून सर्व ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाने मूलभूत गरजा व इतर सर्व सुविधा आदी बाबींवर काम करणार आहे.
निवडीबद्दल श्री शरद देवकाते यांचे विधानपरिषदेचे आमदार प्रा.राम शिंदे साहेब , तरडगाव ग्रामस्थ व युवकांनी शुभेच्छा देवून अभिनंदन केले.







