निकालापूर्वीच आ . प्रा. राम शिंदेचे विजयाचे फ्लेक्स झळकले, कट्टर समर्थक गुलाब खरात यांचा झळकला फ्लेक्स , दोन्ही बाजूंनी विजयाचे कार्यकर्त्यांचे दावे , अनेकांच्या पैजा

0
2877
Google search engine

निकालापूर्वीच आ . प्रा. राम शिंदेचे विजयाचे फ्लेक्स झळकले, कट्टर समर्थक गुलाब खरात यांचा झळकला फ्लेक्स ,

अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी चुरशीने मतदान झाले. जिल्ह्यातील १२ ही विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत काँटे की टक्कर पहावयास मिळाली. जिल्ह्यात सरासरी ७१ टक्के मतदान झाले आहे. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असली तर निकाला पूर्वीच कर्जत जामखेड , नगर शहर व पारनेर मतदारसंघात , आ .राम शिंदे , आमदार संग्राम जगताप व राणी लंके यांचे विजयाचे फ्लेक्स झळकले आहेत.

 

२० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील १२ ही मतदारसंघात मोठ्या चुरशीने मतदान झाले असून सरासरी ७१ टक्के मतदान झाले आहे. मतदानाचा टक्का वाढल्याने नेमका धक्का कोणाला बसतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अशातच आता चौकाचौकात कोण विजयी होणार कोण पराभूत होणार याच्या खमंग चर्चा रंगू लागल्या आहेत. मतदान केंद्रनिहाय कोणाला किती मतदान होईल याची आकडेमोड जोरात सुरु आहे. अनेकांच्या पैजाही पडल्या आहेत.

आपल्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचे गृहीत धरुन कर्जत जामखेड मतदार संघात आ. राम शिंदे , नगर शहर विधानसभा मतदारसंघात व पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात आमदार संग्राम जगताप व राणी निलेश लंके यांच्या विजयाचे फ्लेक्स झळकले आहेत. निकालापूवच फ्लेक्स झळकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत